वाळू माफियांचे धाबे दणाणले, सायगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर बदनापूर पोलिस आणि महसूल विभागाची मोठी कारवाई

दोन टिप्पर ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाळू माफियांचे धाबे दणाणले, सायगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर बदनापूर पोलिस आणि महसूल विभागाची मोठी कारवाई

आधुनिक केसरी न्यूज

बदनापूर : तालुक्यातील सायगाव शिवारात दुधना नदीपात्रातून काही लोकं जेसीबीच्या साहाय्याने अवैध वाळू उत्खनन करत आहेत अशी माहिती (ता.०५) रोजी रात्री  बदनापूर पोलीस व महसूल विभागाला मिळाली त्यावरून पोलीस निरीक्षक एम. टी.सुरवसे यांनी तलाठी श्रीमती सुनीता मदनसिंग नागलोतसह पोलिस पथक रवाना केले. पथकाने सायगाव शिवारात अकस्मात छापा टाकला असता पथकास दुधना नदीपात्रामध्ये जेसीबीच्या साहाय्याने टिप्परमध्ये अवैध वाळू भरुन चोरटी वाहतूक करीत असताना आढळून आले.त्यांना पकडण्यास पथक गेले असता पथकास पाहून आरोपीने आपलली वाहनातील वाळू खाली करुन पळून गेले. पथकाने पाठलाग करुन दोन टिप्पर पकडले तसेच वाळू तस्करांनी अंधाराचा फायदा घेत जेसीबी पळून नेले. पथकाने गजानन संपत उगले,समाधान अशोक उगले,दोन्ही रा. कुंभारी,गणेश काकडे रा.ढवळेश्वर आणि सदर वाहनचालक व मालक यांच्यावर तलाठी श्रीमती सुनीता नागलोत यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच त्यांची वाहने जप्त केली आहेत.   सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल,अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी,उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनखाली बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे,फौ.बाबासाहेब जऱ्हाड, पो.हे.कॉ.अंकुश दासर
पो.कॉ.परमेश्वर धुमाळ
पो.कॉ.अर्जुन परळकर
चालक पो.उप.नि. कुंटे 
यांनी केली आहे..

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : शिकार व पाण्याच्या शोधात शेतशिवारात आलेल्या ४ ते ५ वर्षीय वाघाचा शेतातील कठडे नसलेल्या विहीरीत...
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट
सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार 
चतुरस्त्र सूर हरपला; आ.सुधीर मुनगंटीवार यांची आशाताई भोसले यांच्या निधनाबद्दल हृदयस्पर्शी शोकसंवेदना
संगीताच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय संपला : आ. किशोर जोरगेवार