१२ वर्षीय ४ विद्यार्थिनींवर शिक्षकानेच केले लैंगिक अत्याचार! सोलापूरच्या न्यायालयाने शिक्षकास ठोठावली मरेपर्यंत जन्मठेप
आधुनिक केसरी न्यूज
महेश गायकवाड
सोलापूर : जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षकानेच १२ वर्षीय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले होते. त्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी गुरुवारी (ता. १३) मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. धनाजी सोपान इंगळे (वय ४८, ता. मोहोळ) असे त्याचे नाव आहे.१४ एप्रिल २०२३ रोजी पीडिता शाळेत गेल्यावर तिला शिकविणारे शिक्षक धनाजी इंगळे अगोदरच वर्गात हजर होते. त्यांनी पीडितेला वर्गात थांबवून घेतले व इतर विद्यार्थ्यांना बाहेर थांबायला सांगितले. त्यावेळी वर्गातच शिक्षकाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. शाळेशेजारील शेतकऱ्याने ते पाहिले आणि त्यांना शिक्षकाचे वागणे संशयास्पद वाटले. त्यामुळे दोन-तीन दिवसांपासून त्या शिक्षकावर त्यांनी लक्ष ठेवले. १५ एप्रिल २०२३ रोजी भावाच्या मदतीने त्या शेतकऱ्याने वर्गात गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरा लावला. त्या दिवशीची घटना कॅमेऱ्यात चित्रित झाली होती. ते चित्रीकरण घेऊन मुख्याध्यापकासमक्ष सर्व शिक्षकांना व काही पालकांना बोलावून शेतकऱ्याने कोणाकडून काही गुन्हा घडला असेल तर सर्वांसमक्ष कबूल करावे, असे स्पष्ट केले. त्यावेळी कोणीही समोर आले नाही.
परंतु, त्याचे चित्रीकरण माझ्याकडे असल्याचे म्हटल्यावर इंगळे याने स्वतःहून 'चूक झाली मला माफ करा' अशी विनवणी केली. मुलींना विश्वासात घेऊन विचारल्यावर त्या शिक्षकाने तीन-चार मुलींसमवेत असे कृत्य केल्याची बाब समोर आली. त्यातील एका पालकाने मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी तपास केला होता.
चित्रिकरणातील पीडिता समोर आलीच नाही, तरीही...
आरोपीच्या दहशतीमुळे व मुलींच्या भविष्याचा विचार करून चित्रीकरणात दिसणारी पीडिता व अन्य दोघी, त्यांचे पालक जबाबावेळी आलेच नाहीत. उलट त्यांनी व पीडितेचच्या पालकांनी 'आम्हाला काहीही जबाब द्यायचा नाही' असे लिहून दिले. दुसऱ्या पीडितेचे पालकही मुलीचे भविष्य वाटोळे होईल म्हणून तक्रार देण्याच्या मन:स्थितीत नव्हते. परंतु, पोलिसांनी त्यांना धीर दिला आणि गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
शेतकऱ्याने शाळेत गुपचूप CCTV कॅमेरा लावला, होता म्हणून ही घटना उघडकीस आली होती. अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एन. सुरवसे यांनी हा निकाल दिला असून एका शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने या शिक्षकाचं बिंग फुटलं आहे.
न्यायालयाने शेतकरी आणि डॉक्टरांच्या साक्षी ग्राह्य धरून हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील एका शाळेत धनाजी सोपान इंगळे हा 48 वर्षीय शिक्षक शिकवत होता. तो वर्गात शिकायला येणाऱ्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करत होता. शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या शिक्षकावर मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल केले होते. शाळेच्या बाजूला शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याला शिक्षकाचं वर्तन संशयास्पद वाटलं. त्याने दोन-तीन दिवस शिक्षकावर पाळत ठेवली. 15 एप्रिल 2023 रोजी, शेतकऱ्याने आपल्या भावाच्या मदतीने वर्गात गुपचूप सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. या कॅमेऱ्यात शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचं कैद झालं आहे.
शेतकऱ्याने हे सीसीटीव्ही फुटेज मुख्याध्यापक, इतर शिक्षक आणि काही पालकांना दाखवले. फुटेज पाहून शिक्षकाचे घृणास्पद कृत्य उघडकीस आलं. शेतकऱ्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उल्लेख करताच, धनाजी इंगळेने स्वतःहून चूक कबूल केली आणि माफी मागितली. मुलींना विश्वासात घेऊन विचारल्यावर, त्यांनी शिक्षकाने तीन-चार वेळा लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं.
दरम्यान, याप्रकरणी एका पालकाने मोहोळ पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर आरोपी शिक्षकाच्या दहशतीमुळे आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून, पीडित विद्यार्थिनी आणि तिचे पालक जबाबासाठी कोर्टात आले नाहीत. त्यांनी 'आम्हाला काहीही जबाब द्यायचा नाही' असे लिहून दिले. तरीही, पोलिसांनी धीर देऊन गुन्ह्याचा तपास पूर्ण केला.
खटल्याच्या सुनावणीवेळी फिर्यादी, दुसरी पीडिता, शेतकरी आणि शेतकऱ्याचा भाऊ यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी शिक्षकाला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेप आणि 50 हजारांचा दंड ठोठावला. दंडाची रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले असून या प्रकरणात सरकारतर्फे अॅड. शीतल डोके यांनी काम पाहिलं.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List