मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गुन्हेगारावर फिल्मी स्टाईल गोळीबाराचा प्रयत्न; पोलिसांची सतर्कता आणि अनर्थ टळला
आधुनिक केसरी न्यूज
सुधीर गोखले
सांगली : मिरजेमध्ये निखिल कलगुटगी खून प्रकरणी सध्या पोलीस कोठडीत असलेले आरोपी सलीम पठाण चेतन कलगुटगी आणि विशाल शिरोळे तसेच सोहेल तांबोळी यांना वैद्यकीय तपासणी साठी बुधवारी मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय तपासणी साठी आणण्यात आले. या आरोपींसोबत सहा पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी हवालदार राजेश गवळी सचिन सनदी आणि प्रवीण वाघमोडे आदी पोलीस कर्मचारी तैनात होते. सलीम पठाण याची वैद्यकीय तपासणी सुरु असताना वंश वाली हा संशयित गुन्हेगार बाहेर असल्याचे हवालदार राजेश गवळी याना दिसून आले. हवालदार गवळी यांनी संशयित वाली याला तातडीने पकडून त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे परदेशी बनावटीचे पिस्तुल काडतुसासह सापडले. वाली याची पोलिसांसोबत झटपट सुरु असताना त्याच्यासोबत आलेले अन्य तीन साथीदार त्याच्याकडील कोयता तिथेच टाकून पसार झाले. या सर्व प्रकारामुळे रुग्णालयाच्या आवारात काही वेळ खळबळ उडाली मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानाने एक दुर्घटना मात्र नक्कीच टळली. आज घडलेल्या या प्रकरणात आरोपी सलीम पठाण यांच्याशी वैर असलेल्या वाली आणि त्याच्या साथीदारांचा सलीम पठाण याचा काटा काढायचा आज डाव मात्र पोलिसांनी उधळून लावला. मात्र आजच्या घटनेमुळे रुग्णालय परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक तैनात करण्यात आली आहे काही महिन्यांपूर्वी एका बाळाचे अपहरण याच रुग्णालयातून झाले होते मात्र सांगली जिल्हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे हे बाळ त्याच्या आई कडे सुखरूप पोचले. आता या संशयित वाली बरोबर आलेल्या तीन संशियत साथीदारांच्या शोध मोहिमेसाठी पोलिसांनी सर्च ऑपेरेशन सुरु केले आहे. या घडलेल्या प्रसंगानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारस्कर यांच्या सूचनेनुसार तातडीने पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले आणि म गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देऊन घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमधील हल्लेखोर वाली आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. *या घटनेचा मागोवा* या घटनेच्या मुळातच सलीम पठाण आणि संशयित हल्लेखोर वाली यांच्यातील पूर्व वैमनस्य कारणीभूत आहे. काही महिन्यांपूर्वी मिरज मधील कमानवेस परिसरात कुणाल वाली याचा खून झाला होता हा कुणाल वंश वाली याचा भाऊ आहे. सलीम पठाण याने या हत्येची टीप दिल्याचा राग अंश वाली च्या मनात होता याच कारणावरून आज अंश वाली आणि त्याचे साथीदार सौरभ पोतदार, वैभव आवळे यांच्यासह काटा काढण्याच्या तयारीने रुग्णालयामध्ये आला असण्याचा संशय पोलिसांना आहे. तर हे तिघेही रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List