एसटीच्या परतवाडा आगाराचे मद्यपी व्यवस्थापक निलंबित सुलक्षा व दक्षता विभागाची कारवाई
आधुनिक केसरी न्यूज
रत्नपाल जाधव
मुंबई : (७ नोव्हेंबर) अमरावती विभागातील परतवाडा आगार व्यवस्थापक जीवन दत्तात्रय वानखेडे यानी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केल्याचे आढळुन आल्याने एसटी महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी या आगार व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई केली आहे . विभागीय चौकशी करून त्यात ते दोषी आढळल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे एसटीच्या सुत्रांकडुन माहिती मिळाली आहे.
आगार व्यवस्थापक हे दिवसभर आपल्या कर्तव्यावर उपस्थित न राहता मद्यप्राशन करून आपल्या शासकीय निवासस्थानी पडलेले आहेत अशी माहिती एस टी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाला माहिती मिळताच छापा टाकण्यात आला.मद्यपी आगार व्यवस्थापक जीवन वानखेडे यांची अचलपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करून घेतली आणि त्यांच्या विरोधात परतवाडा पोलीस स्थानकामध्ये *महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ८५(१)* नुसार गुन्हा नोंद केला.
सुरक्षा व दक्षता विभागाने केलेल्या तपासणीमध्ये संबंधित आगार व्यवस्थापक हे दिवसभर मद्यप्राशन करून आपल्या आगारात उपस्थित न राहता बाहेर फिरत असल्याचे आढळुन आले .त्यामुळे आगारातील दैनंदिन वाहतूक विस्कळीत झाली. त्यांच्या कर्तव्यातील हलगर्जीपणामुळे अनेक मार्गावरील बसेस रद्द झाल्या . त्यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान तर झालेच परंतु आपल्या शासकीय निवासस्थानी व आगारात मद्यप्राशन करून गैरवर्तन केल्याबद्दल जन माणसात एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन झाली. असा निष्कर्ष काढून त्यांच्यावर रितसर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या संदर्भात लवकरच प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली त्यांची खातेनिहाय विभागीय चौकशी करून त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर बडतर्फी ची कारवाई करण्यात येईल अशी माहिती सुरक्षा व दक्षता खात्याने दिली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List