मुलाच्या नावाने पुण्यात ४० एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा: हर्षवर्धन सपकाळ

मुलाच्या नावाने पुण्यात ४० एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा: हर्षवर्धन सपकाळ

आधुनिक केसरी न्यूज

मुंबई : दि.६ नोव्हेंबर २०२५ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीने पुण्यातील वतनाची ४० एकर जमीन भ्रष्ट मार्गाने बळकावल्याचे उघड झाले आहे. पार्थ पवार यांनी हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ ३०० कोटी रुपयात म्हणजे कवडीमोल भावाने हडप केली असून स्टँप ड्युटी फक्त ५०० रुपये दिली आहे. सरकारच्या ताब्यात असणा-या वतनाच्या या जमिनीचा व्यवहार झालाच कसा? असा प्रश्न विचारून भ्रष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे म्हटले आहे की, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची अमेडिया नावाची कंपनी असून या कंपनीने कोरेगाव पार्क भागातील जमीन अत्यंत अल्प किंमतीत घेतली आहे, ज्या कंपनीने हा व्यवहार केला त्या अमेडिया कंपनीचे भागभांडवल फक्त १ लाख रुपये आहे. अमेडिया कंपनीला या जागेत आयटी पार्क उभारायचे आहे आणि त्यास सरकारच्या उद्योग संचालनालयाने अवघ्या ४८ तासात मंजुरीही दिली. सरकारच्या ताब्यात असलेली वतनाची जमीन विकत घेता येते का ? स्टॅम्प ड्युटी माफ का केली? असे प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित करून हा व्यवहार रद्द करावा व संपूर्ण व्यवहाराशी संबंधित अधिका-यांना तात्काळ निलंबित करून सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. 

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ‘सारखं मोफत कसं मागता, जरा हातपाय हलवा’ असा दम शेतक-यांना देणाऱ्या अजित पवार यांच्या दिवट्याच्या जमीन व्यवहारात तब्बल २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना अजित पवारांना वेदना का होतात, हे म्हणजे ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं’, असा प्रकार असून हा व्यवहार एक मोठा स्कॅम आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शिरूर तालुक्यात पहाटे ३ ठिकाणी बिबटे जेरबंद - वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे यांची माहिती ७ नवीन पिंजरे शिरूर विभागासाठी दाखल  शिरूर तालुक्यात पहाटे ३ ठिकाणी बिबटे जेरबंद - वनपरिक्षेत्र अधिकारी निलकंठ गव्हाणे यांची माहिती ७ नवीन पिंजरे शिरूर विभागासाठी दाखल 
आधुनिक केसरी न्यूज कवठे येमाई : दि. ०४ शिरूर तालुक्यात सध्या अनेक ठिकाणी ऊस तोड सुरू असून बिबट्यांचे शेतकऱ्यांसह नागरिकांना...
सततची नापिकी आणि बँक कर्जाच्या ताणातून शेतकऱ्याची आत्महत्या
नागपूर निकालाच्या खंडपीठावर विजय वडेट्टीवार यांची तिखट प्रतिक्रिया..! 
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे, जिल्हाधिकारी
देवाभाऊ" साठी ठाण्यात शिवप्रतिमेचा अवमान ! काँग्रेसने पोलखोल करीत केली कडक कारवाईची मागणी
किनवट नगर परिषद निवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज
मीच तुमचा लाडका भाऊ म्हणत पैठणमधे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिले बहीणीला  लखपती करण्याचे अश्वासन