कितीही सांगा, आम्ही फसणारच! सोलापुरातील ६९ वर्षीय भूसार व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगारांकडून ४१ लाख रुपयाचा गंडा; ‘  

कितीही सांगा, आम्ही फसणारच! सोलापुरातील ६९ वर्षीय भूसार व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगारांकडून ४१ लाख रुपयाचा गंडा; ‘  

महेश गायकवाड

आधुनिक केसरी न्यूज

सोलापूर :: लोकांस कितीही सांगा एकत नाहीत आणि फसतात अलीकडेच डिजिटल अरेस्ट बद्धल स्वतः देशाचे मुख्य न्यायमुर्ती भूषण गवई साहेब यांनी ही भाष्य केले होते तरीही सायबर गुन्हेगारी देशात मोठ्या प्रमाणात पसरली आणि घट्ट पाय रोवून असल्याचे सोलापुरात घडलेल्या डिजिटल अरेस्ट मुळे सिद्ध झाले आहे.कितीही सांगा, आम्ही फसणारच! असा बाणा लोकांनी केला असावा सोलापुरातील ६९ वर्षीय भूसार व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगारांकडून ४१ लाख रुपयाचा गंडा घालण्यात आला आहे. 

डिजिटल ॲरेस्ट’ करून हा गंडा घालण्यात आला आहे यांमुळे त्याची, पत्नीही घाबरली अन्‌ डिजिटल अरेस्ट चे गुपित उघडकीस आले आहे.बाजार समितीत भूसार व्यापारी असलेले भुतडा यांना सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४१ लाख रुपयांना गंडा घातला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी शुक्रवारी (ता. ७) सोलापूर शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यांना डिजिटल अरेस्ट केली व अटकेची भीती दाखवून ही फसवणूक केली आहे.

 बाजार समितीत भूसार व्यापारी असलेले भुतडा यांना सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४१ लाख रुपयांना गंडा घातला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी सोलापूर शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सायबर गुन्हेगारांनी त्यांना डिजिटल अरेस्ट केली व अटकेची भीती दाखवून ही फसवणूक केली आहे.


मागच्या महिन्यात अनोळखी क्रमांकावर भुतडा यांना एक कॉल आला. नरेश गोयल हा खूप मोठा फ्रॉडर असून त्याच्या खात्यातून तुमच्या बॅंक खात्यात २५ लाख रुपये ट्रान्स्फर झाल्याचे सांगितले. तुमच्या सीमकार्डवरून समोरील व्यक्तीलाही पैसे पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. तुम्हाला ईडी, सीबीआय व पोलिसांची नोटीस आली असून आता कधीही अटक होऊ शकते, अशी भीती दाखविली. त्याचवेळी ‘या गुन्ह्याचा तपास होईपर्यंत आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतोय’ असे सांगून त्यांना व्हिडिओ कॉल करून बसवून ठेवले.

भुतडा यांच्या मोबाईलवर त्यांच्या मुलाचा फोन येत असल्याने त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर कॉल केला. अटकेच्या भीतीने ७ ते ९ ऑक्टोबर या तीन दिवसांत भुतडा यांच्याकडून सायबर गुन्हेगारांनी ४१ लाख रुपये घेतले. सायबर गुन्हेगारांनी समोरील पाच बॅंक खात्यात ते पैसे ट्रान्स्फर केले. घाबरलेल्या ६९ वर्षीय व्यापाऱ्याने तीन दिवसांत त्यांनी स्वत:च्या कमाईची संपूर्ण रक्कम सायबर गुन्हेगारांना पाठवून दिली. बदनामी होईल म्हणून पोलिसांतही ते गेले नाहीत. २० दिवसांनी त्यांनी मित्र, नातेवाईकांचा सल्ला घेऊन सायबर पोलिसांकडे धाव घेतली. लखनौ, राजस्थान, पश्चिम बंगाल येथील ती बॅंक खाती असल्याची बाब समोर आली आहे. त्यातील एका खात्यात सध्या अवघे सात हजार रुपये आहेत. सोलापूर शहर सायबर पोलिस आता गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

डिजिटल अरेस्ट पोलिस कधीही करत नाहीत

पोलिस ज्या गुन्ह्यात आरोपीच्या अटकेची गरज आहे, त्यावेळी प्रत्यक्षात जाऊन त्याला अटक करतात. डिजिटल अरेस्ट अशी कोणतीही गोष्ट पोलिसांमध्ये नाही. त्यामुळे नागरिकांनी डिजिटल अरेस्ट करण्यासंदर्भात कोणीही बोलले तर थेट पोलिसांमध्ये जावे. घाई, अर्धवट ज्ञान (अज्ञान) व आमिष, या तीन गोष्टीतूनच सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करतात. त्यामुळे प्रत्येकांनी त्या तिन्ही गोष्टींचा विचार केल्यास निश्चितपणे कोणाचीही फसवणूक होणार नाही.

- श्रीशैल गजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (सायबर), सोलापूर शहर

व्यापाऱ्याची पत्नीही घाबरली अन्‌...

समोरील व्यक्तीने पोलिस अधिकारी बोलत असल्याचे सांगून भुतडा यांना अटकेची भीती घातली होती. त्यांच्या पत्नीला ही बाब समजली, त्यावेळी पोलिस घरी येऊन मारहाण करतील, अटक करतील म्हणून त्याही घाबरल्या होत्या. त्यामुळे त्यांनी समोरील व्यक्ती जसे म्हणतोय तसे करायला पतीला काळजीपोटी सांगितले होते.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

कितीही सांगा, आम्ही फसणारच! सोलापुरातील ६९ वर्षीय भूसार व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगारांकडून ४१ लाख रुपयाचा गंडा; ‘   कितीही सांगा, आम्ही फसणारच! सोलापुरातील ६९ वर्षीय भूसार व्यापाऱ्याला सायबर गुन्हेगारांकडून ४१ लाख रुपयाचा गंडा; ‘  
महेश गायकवाड आधुनिक केसरी न्यूज सोलापूर :: लोकांस कितीही सांगा एकत नाहीत आणि फसतात अलीकडेच डिजिटल अरेस्ट बद्धल स्वतः देशाचे...
अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही : हर्षवर्धन सपकाळ
मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयात गुन्हेगारावर फिल्मी स्टाईल गोळीबाराचा प्रयत्न; पोलिसांची सतर्कता आणि अनर्थ टळला 
नांदेडच्या वडेपुरी शिवारात बिबट्याचा वावर; गावकऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
एसटीच्या परतवाडा आगाराचे  मद्यपी व्यवस्थापक निलंबित सुलक्षा व दक्षता विभागाची कारवाई
वाळू माफियांचे धाबे दणाणले, सायगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर बदनापूर पोलिस आणि महसूल विभागाची मोठी कारवाई
मुलाच्या नावाने पुण्यात ४० एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करा: हर्षवर्धन सपकाळ