गडचांदूरात शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात तिसरी आघाडी श्रीतेज प्रतिष्ठानचे निलेश ताजणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गोंडवाना पक्षाचा पाठिंबा
आधुनिक केसरी न्यूज
गडचांदूर : गडचांदूर येथे ॲड. वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनात तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली आहे . नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलेश ताजणे असतील. शेतकरी संघटना ९, गोंडवाना २, श्रीतेज गट ९ असा फॉर्म्युला असेल अशी माहिती शेतकरी संघटना ज्येष्ठ नेते विलासराव धांडे, शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप, गोंडवानाचे पांडुरंग जाधव, रामा मोर यांनी दिली. या सर्व उमेदवारांचे नामांकन अर्ज आज दाखल करण्यात आले.
गडचांदूर शहरात शेतकरी संघटनेचा निर्णायक पारंपरिक मतदार आहे. ग्रामपंचायत असताना त्यांनी सत्ता देखील मिळवली होती. प्रत्येक प्रभागात तुल्यबळ कार्यकर्ते आजही आहेत. गोंडवाना पक्षाचा देखील आदिवासीबहुल भागात प्रभाव आहे. तसेच श्रीतेज प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने गडचांदूर शहरात सर्वदूर विविध उपक्रम राबविले आहेत. दरम्यान काँग्रेस पक्षासोबत अनेक वर्षांपासून असणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अरुण निमजे, माजी नगरसेवक राहुल उमरे, रफिक निझामी हे नगराध्यक्ष पदासाठी बंडखोरी करत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शरद जोगी हे देखील नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे. नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार आहे. नव्याने निर्माण झालेल्या या तिसऱ्या आघाडीमुळे स्थानिक आमदार देवराव भोंगळे यांच्यासमोर चांगलेच आव्हान निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात होणारी ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल्यामुळे ते या आव्हानाला कसे सामोरे जातात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List