खेर्डा खुर्द येथील शेतकऱ्यांनी साहेबांच्या रिकाम्या खुर्चीला दिले विविध मागण्यांचे निवेदन
आधुनिक केसरी न्यूज
सागर झनके
जळगाव जा : जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा खुर्द गावातील लोकांनी व वनूर शेत शिवारातील शेतकऱ्यांनी आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जळगाव जामोद शहरातील महावितरण ऑफिस मधील सहाय्यक उप अभियंता बुरहानुद्दीन एस चौबारीवाला साहेब ऑफिसमध्ये हजर नसल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन दिले. वनुर शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील वीज वारंवार जात असून त्यामुळे त्या शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे त्याचबरोबर खेर्डा खुर्द गावातील डी.पी. वारंवार बंद पडून गावातील लाईट जात आहे. त्यामुळे विजेच्या या लपंडावामुळे ग्रामस्थ चांगलेच हैराण झाले आहेत. त्यामुळे वनूर शिवारातील शेतकरी व खेर्डा खुर्द गावातील गावकऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महावितरणच्या कार्यालयात येऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. जर तात्काळ आमच्या विजेच्या संदर्भात आपण दखल घेतली नाही तर आम्ही सर्व शेतकरी व गावकरी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी यावेळी दिला सदर निवेदनावर ज्ञानदेव खमणकार, ऋषिकेश देशमुख, रामदास नवथळे ,भास्कर घोपे प्रकाश वानखडे, दीपक घोपे, सुमित चव्हाण या शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List