खरिप पिकांसह उभा ऊस पाण्यात;ताई, तुम्हीच सांगा अशा परिस्थितीत आम्ही जगायचं कसं? शेतकऱ्यांचा टाहो !

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी

खरिप पिकांसह उभा ऊस पाण्यात;ताई, तुम्हीच सांगा अशा परिस्थितीत आम्ही जगायचं कसं? शेतकऱ्यांचा टाहो !

आधुनिक केसरी न्यूज

 कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यात मागील आठवडाभरात ढगफुटीसदृश्य पाऊस झालेला आहे.दररोज पावसाची संततधारा सुरूच आहे.या पावसामुळे शेतकऱ्यांची जमीनही खरडून निघाली आहे.पावसाने होत्याचं नव्हत झालेला आहे.खरिप हंगामातील कापुस,तूर, सोयाबीन पिकांची नासाडी झालेली आहे.संपूर्ण पिके वाया गेली आहे.उभा ऊस पाण्यात आहे.अशा परिस्थितीत आम्ही जगायचं कसं असा एकच टाहो संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यासमोर फोडला.

राज्याच्या पशुसंवर्धन तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी बुधवारी (ता.२४) रोजी  विरेगव्हाण तांडा (ता.घनसावंगी) येथील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत सविस्तर माहिती घेतली.तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

यावेळी आ.हिकमत उढाण, सुनील आर्दड,रविंद्र तौर, राहुल लोणीकर, उद्धव मरकड, अनिरूद्ध शिंदे, अशोक उदावंत, अनिल सानप,तहसीलदार श्रीमती पुजा वंजारी, गटविकास अधिकारी डॉ.समीर जाधव, कृषी अधिकारी सखाराम पवळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता श्रीरामसागर जलाशयातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग; सिरोंचा तालुक्यात पूरस्थितीची शक्यता
आधुनिक केसरी न्यूज गडचिरोली, दि. 29 सप्टेंबर (जि.मा.का.) : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे 13 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार असून...
राज्यातील अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, त्यांना मिळणारी नुकसान भरपाई या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात यावे
खडकपूर्णाचे सर्व वकद्वार दीड मीटरने उघडले महामार्गावरील पूल ५ वर्षां नंतर पाण्याखाली 
नाथ मंदिराकडे जाणारा रस्ता पाण्याखाली, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील व्यापाऱ्यांनी साहीत्य हलवले 
श्री संत गजानन महाराज संस्थान ची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी 11 लाखांची मदत
औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
येरळा नदी पत्रातून एक जण वाहून गेले