शेळगाव गौरी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटार व केबलची चोरी
आधुनिक केसरी न्यूज
तानाजी शेळगांवकर
नायगाव : शेळगाव गौरी तालुका नायगाव येथील नदीच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक विहिरीवरुन ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या विहिरीवरील मोटार व मोटारीचे केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने गावात भर उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने येथील सार्वजनिक विहिरीवरील वारंवार मोटारी व केबल चोरीच्या घटना घडत असल्याने या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने रामतीर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
शेळगाव गौरी हे गाव स्वच्छ गाव सुंदर गाव माझे गाव म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे या गावातील नागरिकांना पाण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाशेजारी असलेल्या नदीजवळ असलेल्या विहिरीवरून पाणीपुरवठा केला जातो मात्र या विहिरीवर पाणीपुरवठा करण्यासाठी असलेली मोटार व केबल वारंवार अज्ञात चोरटे चोरून नेत असल्याने गावातील सामान्य नागरिकांना अनेक वेळा भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
ग्रामपंचायत च्या माध्यमातून सार्वजनिक विहिरीवरील साठ हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार व सुमारे 25 ते 30 हजार रुपये किमतीचे केबल असे एकूण 90 हजार रुपये किमतीचे मोटार व केबल अज्ञात चोरट्यांनी भर उन्हाळ्याच्या दिवसात चोरून नेल्याने गावातील सामान्य नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीला बदनाम करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक वारंवार मोटारी व मोटारीचे केबल चोरून नेण्याच्या घटना घडत असल्यामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटार व केबल वारंवार चोरणाऱ्या चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List