माहुर : श्री दत्तशिखर संस्थानच्या मंदिरात त्रिमूर्ती दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा
आधुनिक केसरी
संजय घोगरे
श्रीक्षेत्र माहूर : येथील श्रीदत्त शिखर संस्थानच्या दत्त मंदिरात अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुधवार दि. 30 एप्रिल रोजी स. 9 वा. प. पू. प. म.श्री मधुसूदनजी भारती महाराज यांच्या हस्ते त्रिमूर्ती दत्तात्रेयांच्या (चांदीच्या धातूची )मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली.यावेळी वेदमंत्राच्या उदघोषाने व दत्त नामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता.या विधीचे पौरोहित्य विलास जोशी, रवींद्र जोशी, ऋषिकेश जोशी व विकास जोशी यांनी केले.
श्रीदत्त शिखर मंदिरात पूर्वी पादुका व एकमुखी दत्ताच्या मूर्तीची पूजा केली जात असे.आता मात्र 20 किलो वजनाच्या 2.5 फूट उंची एवढ्या तीन मुखी दत्तात्रेयांचे भाविकांना दर्शन घडणार आहे. ही मूर्ती बनविण्यासाठी प्रथम शाडू व प्लास्टिकचा साचा मुंबई येथील शिल्पकार तेजस भोईर यांनी बनविला असून चांदीची मूर्ती खामगाव येथील विश्वकर्मा ज्वेलर्स यांनी बनवली आहे.मूर्ती प्रतिष्ठापणा करतेवेळी मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराज,चिंतामण भारती महाराज,दिलीप भारती महाराज,शिलानंद भारती महाराज, शाम भारती महाराज,अक्षय गिरी, गोवर्धनबन महाराज,मोहनदास भारती महाराज,वामन भारती, संतोष भारती, नितेश भारती,शिवाजी गिर्ही,माधव गिर्ही,सचिव डॉ. गणेश पाटील, व्यवस्थापक जी. एन.नाईक, लेखापाल प्रकाश गायकवाड यांचेसह मोठ्या प्रमाणात दत्तभक्त उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List