सहायक अभियंत्याने स्वीकारली दोन हजाराची लाच ; एसिबीने ताब्यात घेतास कठोर कारवाई..!
आधुनिक केसरी न्यूज
वर्धा : ऑनलाईन नेट मीटरिंग तसेच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारतांना महावितरणच्या सहायक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. ही कारवाई बोरगाव (मेघे) येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभाग कार्यालय परिसरात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्याने ग्राहकाच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसविले. सोलर पॅनल बसविल्यानंतरही सहाय्यक अभियंत्यांनी नेट मीटरिंग न केल्यामुळे ग्राहकाला वीज बिल जास्त येत होते. याबाबत संबंधितकडे अर्ज दाखल केला होता. ऑनलाइन नेट मीटरिंग तसेच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी सहायक अभियंता मधुसूदन पेठे यानी साडेतीन हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. पडताळणी करून सापळा रचला. २४ एप्रिल रोजी सहायक अभियंता मधुसूदन पेठे यास दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई डॉ. दिगंबर प्रधान ,पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात संदीप मुपडे, प्रभारी पोलीस उप अधीक्षक, पोलिस निरीक्षक अरविंद राऊत, मंगेश गँधे, पोहवा प्रशांत वैद्य, पंकज डहाके, पंकज टाकोणे, राखी फुलमाळी, शीतल शिंदे, प्रीतम इंगळे, लक्ष्मण केंद्रे, प्रशांत मानमोडे, गणेश पवार, मनिष मसराम, विनोद धोंगडे यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.
About The Author
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List