आज पैठण बंद ..आता मेनबत्ती लावुन श्रध्दांजली नको सरकारने पाक विरोधात ठोस निर्णय घ्यावा : शिवराज भुमरे
आधुनिक केसरी
दादासाहेब घोडके
पैठण : पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्यांचा निषेधार्थ पैठण शहरात सोमवार दि,28 रोजी सकल समाज व नागरीकांच्या वतीने पैठण शहर बंदची हाक देत बस स्टँड चौकात सकाळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत निषेध नोदंवला व हल्यांतील मृत नागरिकांना पैठणकराच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी शिवसेना,भाजप,कॉग्रेस,तसेच विविध संघटनाचे पदाधिकारी यांनी श्रध्दांजली वाहीली.
यावेळी सरपंच शिवराज भुमरे यांनी श्रध्दांजली पर बोलताना आता मेनबत्ती लावुन श्रध्दांजली नको सरकारने पाक विरोधात ठोस निर्णय घ्यावा.काश्मीर संपूर्ण ताब्यात घेऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याची हिच वेळ असल्याने पहलगाम येथील हल्यांचा निषेध व्यक्त केला.
यावेळी माजी मंत्री अनिल पटेल,माजी आमदार संजय वाघचौरे,माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी,माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे,सह सकल हिंदू समाज व नागरीकांची उपस्थिती होती.
आज सकाळ पासून पैठण शहरातील दुकाने, हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापना बंद ठेवत नागरिक, व्यापारी, राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List