भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही? 

आधुनिक केसरी

मुंबई : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत हे अत्यंत संताप आणणारे कृत असून सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना अतुल लोंढे म्हणाले की, अमरावती मध्ये २६ तारखेला भाजपा नेत्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री दत्ता भरणे, आ. गोपीचंद पडळकर आणि इतर नेत्यांचा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा सोहळा होत आहे. पहलगामच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या चितेची राख विझलेली नाही. या नागरिकांच्या घरी आजही दुःखाचे वातावरण आहे ते अजून या धक्क्यातून सावरले नाहीत. परंतु भाजपा नेते मात्र हार तुरे घेत आहेत हीच भाजपाची संस्कृती आहे का? राम शिंदे हे संवैधानिक पदावर आहेत, या नेत्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा तरी विचार करायला हवा होता. दुसऱ्याच्या घरी दुःख आहे, त्याचे या भाजपा नेत्यांना काहीच देणेघेणे नाही, असेही अतुल लोंढे म्हणाले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दगडूशेठ गणपतीला  ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य  दगडूशेठ गणपतीला  ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य 
आधुनिक केसरी न्यूज पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला  ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती...
सहायक अभियंत्याने स्वीकारली दोन हजाराची लाच ; एसिबीने ताब्यात घेतास कठोर कारवाई..!
आज पैठण बंद ..आता मेनबत्ती लावुन श्रध्दांजली नको सरकारने पाक विरोधात  ठोस निर्णय घ्यावा : शिवराज भुमरे
 भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही? 
चंद्रपूरचे सात नागरिक पहलगाममध्ये अडकले,आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली तात्काळ दखल..!
भिमजयंती निमित्त वरुड येथे पोलिसांचा रूट मार्च
ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस