अखेर झुंज थांबली,माजी आमदार अरुण (काका) जगताप यांचे निधन

अखेर झुंज थांबली,माजी आमदार अरुण (काका) जगताप यांचे निधन

आधुनिक केसरी न्यूज

अहिल्यानगर :  माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे दोन टर्म सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज दि. २ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.पुणे येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली ते ६७ वर्षांचे होते.या वृत्ताने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.अरुणकाका जगताप यांचं पार्थिव दुपारी २.०० वाजता सारसनगर येथे त्यांच्या राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्या पार्थिवावर ४. ०० वाजता अहिल्यानगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली. मागील काही दिवसांपासून पुणे येथे खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार चालू होते.तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. अरुण काकांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यात खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजताच त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारो चाहत्यांनी पुण्याकडे धाव घेतली होती. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. अरुणकाकांवर अतिदक्षता विभागात उपचार चालू असल्याने त्यांना कोणालाही भेटता येत नसल्याने नागरिकांनी नगरहून पुण्यात येऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी केले होते.

अरुण जगताप हे नगरच्या राजकारण आणि समाजकारणात काका नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती, मुले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे ते व्याही होते. अरुण जगताप यांची राजकीय कारकीर्द ही काँग्रेसमधून सुरू झाली. युवक काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अहमदनगरपालिकेचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष होते. तसेच गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष होते. अरुण जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोनवेळा स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

20 दिवसांच्या बाळाची चोरी झाली असा कांगावा करणारी आईच निघाली त्या बाळाची मारेकरी.... नोकरी करायची होती, मुल नको होते म्हणुन बाळाला फेकले नदीत..! 20 दिवसांच्या बाळाची चोरी झाली असा कांगावा करणारी आईच निघाली त्या बाळाची मारेकरी.... नोकरी करायची होती, मुल नको होते म्हणुन बाळाला फेकले नदीत..!
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया : तालुक्यातील डांगोर्ली येथील 20 दिवसांच्या बाळाचा  खून जन्मदात्या मातेनेच केल्याचा धक्कादायक उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने...
दहा फुटाच्या अजगराला सर्पमित्राने दिले जीवदान 
मौजा उदापूर, ब्रम्हपुरी येथील इथेनॉल प्लॅंट ला भीषण आग 
जेसाभाई मोटवानी आणि घनशाम मूलचंदानी काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित 
वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी देवानंद दामोदर‌
लाडसावंगी बाजारपेठेला येणार चांगले दिवस : हरिभाऊ बागडे
छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस