मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी यांची सी.आय.आय.आय.टी. केंद्राला भेट
आधुनिक केसरी न्यूज
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे घटक असलेल्या आदर्श पदवी महाविद्यालय अंतर्गत सी.आय.आय.आय.टी. केंद्राचा माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान आणि ऑटो मोबाईल क्षेत्रासंबंधित विविध कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले जातात. या प्रशिक्षण केंद्राला नुकताच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रवींद्र कुलकर्णी यांनी भेट देऊन केंद्राविषयी माहिती घेतली आणि उपस्थित विद्यार्थ्यांसोबत संवाद साधले. यावेळी त्यांनी प्रशिक्षण केंद्र आणि आदर्श पदवी महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या विविध कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम आणि त्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्याना होणाऱ्या फायद्या संदर्भात माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन रोजगारभिमुक बनवण्याचे कार्य करत असल्याबद्दल त्यांनी प्रशिक्षण केंद्र आणि आदर्श पदवी महाविद्यालयाचे कौतुक केले.
ही भेट गोंडवन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या सहकार्यातून झाली असून यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरु डॉ श्रीराम कावळे, न.न.व सा. चे संचालक डॉ. मनीष उत्तरवार, मानव विज्ञान चे अधिष्टता तथा रा.से.यो. चे संचालक डॉ. श्याम खंडारे, आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कृष्णा कारू, पदव्यूत्तर विभागातील डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. प्रितेश जाधव तसेच महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List