समाज माध्यम
© कस्तुरी देवरुखकर समाज माध्यमा मुळे जीवनशैलीत नक्कीच फरक पडतोय.आता हा फरक सकारात्मक की नकारात्मक हे आपण त्याचा कशाप्रकारे वापर करतोय यावर अवलंबून आहे असे मला वाटते. नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे समाज माध्यमाला ही दोन बाजू आहेत. तुम्ही चांगली बाजू पाहिलीत तर लक्षात येईल, या समाज माध्यमा मुळे विचारांचे आदान प्रदान मोठ्या प्रमाणात होऊ… Continue reading समाज माध्यम
© कस्तुरी देवरुखकर


समाज माध्यमा मुळे जीवनशैलीत नक्कीच फरक पडतोय.आता हा फरक सकारात्मक की नकारात्मक हे आपण त्याचा कशाप्रकारे वापर करतोय यावर अवलंबून आहे असे मला वाटते. नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे समाज माध्यमाला ही दोन बाजू आहेत.
तुम्ही चांगली बाजू पाहिलीत तर लक्षात येईल, या समाज माध्यमा मुळे विचारांचे आदान प्रदान मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. एखादी अबोल व्यक्ती ही सोशल मिडीया द्वारे भरभरून चर्चा करू लागली आहे.विविध प्रकारचे साहित्य समाजातील सर्व स्तरांपर्यंत क्षणार्धात पोहचवता येतेय. ही एकार्थाने वैचारिक क्रांतीच आहे.
दुसरी बाजू म्हणजे समाज माध्यमाचा होणारा अतिरिक्त वापर. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केव्हाही वाईटच. त्यातूनच आपण नवनवीन समस्या निर्माण करत असतो.हे सर्व जरी असले तरी पारडे सकारात्मकतेकडे झुकतेय.एक विचार करण्या सारखी गोष्ट म्हणजे आपण हल्ली फेसबुक,वाँट्स अपवर चर्चा घडवून आपली मतं मांडतो ती या समाज माध्यमाचीच किमया आहे.
आज प्रत्येकाच्या घरात दूरदर्शन संच अाहे. त्याला जोडलेले रिमोट ही असते. त्या टी वी वर अनेक प्रकारच्या वाहिन्या असतात. तिथे कुठल्या प्रकारचे चित्र दाखवले जावे हे हातात नसले तरी त्याचे रिमोट तर आपल्या ताब्यात असते. आपण ठरवू शकतोना काय काय पाहायच आणि किती वेळ पाहायचे ते. तर मुद्दा हा आहे की समाज माध्यमात कोणी सहभाग घ्यावा अथवा घेऊ नये हे आपल्या हातात नसते.मात्र आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो.
इथे चांगली माणसे आहेत तसे विकृत मनोवृत्तीचे महाभाग सुध्दा आहेत. परंतु, आपल्याला व्यक्तीस्वातंत्र्य आहेच की. आपण ठरवू शकतो कोणाला किती महत्व द्यायचे अथवा नाही. दुसरा मुद्दा म्हणजे याचा होणारा अतिरिक्त वापर. ती गोष्ट तुमच्यावरच अवलंबून आहे. जर तुम्ही मनावर नियंत्रण ठेवले तर समाज माध्यम व्यसन न राहता काळाजी गरज वाटेल.
अनुकुल परिस्थितीत राहून विकास करणे सोप्पे असते. कठीण आहे ते प्रतिकुलतेवर मात करत प्रगती करणे. म्हणजेच समाज माध्यमाची वाईट बाजू पाहून त्यावर वाद विवाद करत रहाण्यात वेळ घालवण्या पेक्षा याची चांगली बाजू लक्षात घेऊन, त्याचा फायदा करून त्यायोगे काहीतरी उत्तम घडवण्याची वृत्ती हवी.एखाद्या प्रवास करताना अनेक लोकांशी संपर्क येतो. काही तास बोलणे, गप्पागोष्टी होतात. त्यावेळे पुरती तोंड ओळख होते. प्रवास मजेत जातो. त्या भेटलेल्या व्यक्ति कडून अपेक्षा नसतात अथवा ती व्यक्ती पुन्हा भेटणार नसते. तरीही सहप्रवाशी गरजेचे असतात. याचा अर्थ संवाद गरजेचा असतो. तोच संवाद समाज माध्यमातून सहज होतो.
परदेशी स्थायिक असलेल्या मुला मुलींना या माध्यमाव्दारे भारतात निवासीत असलेल्या आई वडिलांना समोरा समोर पाहता येते. एखाद्या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट शक्य नसल्यास या माध्यमाचा वापर करुन एकमेकांना भेटता येते.
समाज माध्यम म्हणजे जनमानसाच्या मनाचे,विचारांचे,कलागुणांचे,सुख दुःखाचे प्रक्षेपण करणारा दूरदर्शन संच आहे. इथे रोखठोक मते मांडली जातात, त्यावर चर्चासत्र आयोजीत होतात.शाब्दिक हेवेदावे होतात, या माध्यमाचा जाहिरातीचे साधन म्हणून वापर केला जातो, बातम्या पोहचवणारा दूत ही हाच, तर इथेच सर्वांशी गट्टीही जमते.आज माझ्या भोवती जे साहित्यिक वलय आहे ते या समाज माध्यमाची देणगी आहे. प्रत्येक गोष्टीचे फायदे तोटे असतात.चांगल्या बाजूचा विचार करणे आपल्याच हातात असते नाही का……!
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List