पैनगंगा नदीत वाहून गेला ४५ वर्षीय युवक ; दोन दिवसाच्या अथक प्रयत्नाने एनडीआरएफ पथकाला यश
आधुनिक केसरी न्यूज
सिध्दार्थ वाठोरे
हदगाव : तालुक्यातील हरडफ बंधाऱ्यावरुन देवसरी कडे जाताना ४५ वर्षीय युवकाचा पाय घसरून बंधाऱ्यावरून तोल जावून पैनगंगा नदीत वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना दि. ९ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
संदीप प्रतापराव देवसरकर (४५) असे मृतकाचे नाव असुन तो देवसरी गावाजवळील पैनगंगा नदीवरील हरडफ बंधाऱ्यावर मागील दोन दिवसाअगोदर सायंकाळी ५ वाजता फिरण्यासाठी गेला होता अचानक त्याचा पाय घसरल्याने तोल गेला व तो बंधाऱ्यात कोसळला
पैनगंगा नदिवर इसापूर धरणावर गेट उघडल्याने मोठया प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरु असल्याने संदीप हा नदिच्या पात्रात वाहून गेला. याची माहीती देवसरीचे पोलिस पाटील देविदास पंडितराव देवसरकर यांनी उमरखेड पोलिसांना दिल्याने मागील दोन दिवसापासून संदीपचा शोध पोलिस घेत होते मात्र त्यांना यश आले नाही
म्हणून प्रशासनाने यवतमाळ येथील एनडीआरएफच्या पथकाला काल पाचारण केले असता वाहून गेलेला संदीप हा चातारी येथील नदीपात्रातील बंधाऱ्यात एनडीआरएफच्या पथकाला मृत अवस्थेत सापडला संदीपच्या मृत्यूने देवसरी गावावर शोककळा पसरली असून संदीपवर शवविच्छेदन हे जागेवरच करण्यात आले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List