महिलांना आर्टिफिशियल ज्वेलरी मोफत प्रशिक्षण
आधुनिक केसरी न्यूज
बल्लारपूर : शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिऱ्हे व उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव यांच्या हस्ते बल्लारपूर विधानसभा शहरात शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षातर्फे महिला कृत्रिम दागिने प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक सौ. मनस्वी संदीप गीऱ्हे .जिजा फाउंडेशन अध्यक्ष दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात महिलांना कृत्रिम दागिन्यांचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे संचालन संघटिका मीनाक्षी गलगट यांनी केले.
महिला जिल्हा संघटीका कल्पनाताई गोरगाटे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमात संख्या संख्येने महिला उपस्थित होते.
यावेळी तालुका महिला संघटिका मीनाक्षीताई गलगट, शहर संघटिका ज्योतीताई गेहलोत, रिता बेंवंशी, नेहा मुंदडा, शारदा अक्केवार, ज्योती , बॉबी कदासी, माजी नगरसेवक रंजीता बिरे आशा माझी,पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List