पत्रकारीतेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे आदर्श व्यक्तिमत्व गंगाधर गंगासागरे
आधुनिक केसरी न्यूज
तानाजी शेळगांवकर
नायगाव : अखिल भारतीय गुरु रविदास समता परीषदेचे जिल्हाध्यक्ष तथा नायगांव तालुका डिजिटल मिडीया परीषदेचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार गंगाधर एम.गंगासागरे हे गुरु रविदास , फुले-शाहु-आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज यांसह महामानवांच्या विचारधारेला अनुसरुन सामाजिक चळवळीत सदा अग्रेसर आसणारे अष्टपैलू व्यक्तीमत्व होय. त्यांचा आज ८ मे रोजी ५३ वा वाढदिवस या निमित्ताने त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख प्रकाशीत करीत आसतांना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे .
श्रीयुत गंगाधरराव गंगासागरे यांची जन्मभुमी मन्याड नदी काठावरील मावली ता.मुखेड मात्र त्यांची कर्मभुमी नरसी ता.नायगांव जि.नांदेड आहे . त्यांचा जन्म ८ मे १९७२ रोजी मावली येथे एका सामान्य चर्मकार कुटूंबात झाला त्यांच प्राथमिक शिक्षण जि.प. प्रा.शा. मावली व बेटमोगरा येथे झाले . १९८३ ला मन्याड नदीला महापूर आला आणि मावलीसह नदी काठावरील गावे होत्याची नव्हते झाली . ही नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने त्यांचे आई-वडील यांनी संघर्षमय प्रवास करीत गाव सोडायचा निर्णय घेवून १९८४ ला नरसी येथे वास्तव्यास येवून राहीले . त्यामुळे नरसी या चौरस्त्याच्या ठिकाणी राहून पुढील शिक्षणासाठी नायगांवचे जनता हायस्कुल व शरदचंद्र महाविद्यालय येथून कला शाखेची पदवी मिळवून पदव्युत्तर शिक्षणासाठी नांदेड जिल्हा गाठला तेथील नेताजी सुभाष चंद्रबोस महाविद्यालयातून एम.ए.(लोकप्रशासन ) ही मास्टरडीग्री मिळविली . तदनंतर निवडमंडळ व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला . मात्र त्याकाळी वधारलेल्या वशीलेबाजीमुळे यश मिळाले नाही . तरीपण खचून न जाता आई-वडीलांनी काबाडकष्ट करुन शिकविलेल्या शिक्षणाचे सार्थक व्हावे या उद्देशाने पत्रकारीतेच्या क्षेत्रात सहभागी झाले . आणि मागील दोन तपांपासून सत्यप्रभा , मराठवाडा , लोकमत , पुण्यनगरी या वर्तमानपत्राच्या माध्यमातून तसेच एमसीएन न्युज चैनलच्या माध्यमातून सकारात्मक पत्रकारीता करीत आहेत . त्यांना २०१२ या वर्षी परभणी येथील साहीत्य संमेलनात "गुरु रविदास लेखन पुरस्कार" मिळाला व २०१४ नांदेड येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तथा दै.समिक्षा मंथन ब्लड ग्रुपच्या वतीने ग्रामिण पत्रकार म्हणून गौरविण्यात आले . तसेच १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पुणे (कात्रज ) येथील गुरु रविदास मंदीर ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले . दुसरी गोष्ट सामाजिक कार्य करीत आसतांना पत्रकार गंगाधरराव गंगासागरे हे मागील दहा वर्षापासून अखिल भारतीय गुरु रविदास समता परीषद या राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कार्य करीत आसतांना नांदेड जिल्हाध्यक्ष (ग्रामिण ) ही महत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत . जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य करीत आसतांना नरसी येथे मागील पाच वर्षापासून क्रांतीकारी महामानव जगतगुरु गुरु रविदास महाराज यांची जयंती समाज बांधवांना सोबत घेवून साजरी करीत आहेत . आणि आपल्या गावात नरसी येथे गुरु रविदास मंदीर बांधकाम झाले पाहीजे यासाठी भावंडाना व समाजबांधवांना सोबत घेवून जोमाने कार्य करत मंदिर व प्रेरणाकेंद्र इमारत बांधकाम केले .अशा या अष्टपैलू व्यक्तीमत्वाला प्रगटदिनाच्या निमित्ताने मनस्वी अभिष्टचिंतन !
पत्रकार तानाजी शेवाळकर
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List