देगलूर तालुक्यातील  तमलूरचा सचिन वनंजे  शूर पुत्र देशासाठी शहीद 

देगलूर तालुक्यातील  तमलूरचा सचिन वनंजे  शूर पुत्र देशासाठी शहीद 

आधुनिक केसरी

मनोज बिरादार

 देगलूर : काश्मीरच्या तुफानी थंडीमध्ये देशसेवेचे व्रत जोपासणारे तमलूर (ता. देगलूर) गावचे सुपुत्र जवान सचिन यादव वनंजे (वय ३०) यांनी आज देशासाठी आपले प्राण अर्पण केले. दुपारी १२ ते १ च्या सुमारास ड्युटीवर असताना त्यांचे वीरमरण झाले. या दु:खद घटनेने संपूर्ण देगलूर तालुका शोकमग्न झाला आहे.

शहीद सचिन वनंजे हे लहानपणापासूनच राष्ट्रसेवेसाठी प्रेरित होते. देशभक्तीची ठिणगी त्यांच्या मनात लहान वयातच चेतली होती. त्यांनी भारतीय सैन्यदलात भरती होऊन अनेक वर्षे देशसेवा केली. कर्तव्यपरायणता आणि शिस्त हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मुख्य गुण होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, आठ महिन्यांची चिमुकली मुलगी, दोन भाऊ आणि आई-वडील असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्याग आणि बलिदान हेच खरे शौर्याचे प्रतीक असते.
सचिन वनंजे यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन देशासाठी अजरामर इतिहास लिहिला. त्यांचे नाव आणि त्यांचे शौर्य कधीही विसरले जाणार नाही. तमलूर गावाचा हा वीरपुत्र कायमच्या स्मृतीत राहील.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

दहा फुटाच्या अजगराला सर्पमित्राने दिले जीवदान  दहा फुटाच्या अजगराला सर्पमित्राने दिले जीवदान 
आधुनिक केसरी न्यूज करंजी :  राजीव आगरकर करंजी जवळून पाच किलोमीटर अंतरावर ढोकी शेत शिवारात गुराख्याकडून मोबाईल वर करंजी येथील...
मौजा उदापूर, ब्रम्हपुरी येथील इथेनॉल प्लॅंट ला भीषण आग 
जेसाभाई मोटवानी आणि घनशाम मूलचंदानी काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित 
वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी देवानंद दामोदर‌
लाडसावंगी बाजारपेठेला येणार चांगले दिवस : हरिभाऊ बागडे
छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गडचांदूरात शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात तिसरी आघाडी श्रीतेज प्रतिष्ठानचे निलेश ताजणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गोंडवाना पक्षाचा पाठिंबा