'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' : अजित पवार यांचे बारामतीत महिला- भगिनींनी ....
On
आधुनिक केसरी न्यूज
बारामती : राज्याच्या अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजने'सह महिला- भगिनींसाठी अनेक योजनांचा समावेश करून त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला- भगिनींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विमानतळ येथे ओवाळून त्यांचे आभार मानले.
यावेळी अपर पोलीस अधिक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता अमोल पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, आदींसह प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे, मोनिका हरगुडे यांच्यासह विविध क्षेत्रातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Tags:
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Latest News
13 Feb 2025 10:10:37
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : दि. 13 रोजी नौकर भरती च्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या चंद्रपूर जिल्हा...
Comment List