ना.. पोल ना.. तारा.. तरी विद्युत बिलाचा भडीमारा  ; मयत शेतकऱ्याच्या वारसांना विद्युत महामंडळाचा झटका  

सतरा वर्षांपूर्वी विद्युत पुरवठा मागणी करून  ही आजपर्यंत प्रतीक्षाच

ना.. पोल ना.. तारा.. तरी विद्युत बिलाचा भडीमारा  ; मयत शेतकऱ्याच्या वारसांना विद्युत महामंडळाचा झटका  

आधुनिक केसरी न्यूज 

 सुधाकर जेठे

 फुलंब्री  : तालुक्यात विद्युत महामंडळाचा अनोखा प्रकार समोर आला असून एका शेतकऱ्याने २००७ मध्ये विद्युत मागणी करत कोटेशन भरूनही आजपर्यंत विद्युत पुरवठा मिळाला  नाहीत. परंतु शेतकऱ्यांच्या मरणानंतर शेतकऱ्याचा वारसांना दोन लाखापेक्षा जास्त बिल देऊन एक सौम्य झटका दिला आहे. सदर बिल माफ करून त्वरीत विद्युत पुरवठा सुरू करावा, अशी मागणी मयत शेतकर्यांच्या वारसांनी केली आहे.
फुलंब्री तालुक्यातील मौजे वडोद बाजार येथील वडोद खुर्द शिवारातील गट नंबर 38 आणि 39 या शेतात असलेल्या विहिरीवर मोटार बसवण्यासाठी २००७ मध्ये मयत शेतकरी मोतीराम पूर्णाजी केवट यांनी विद्युत महावितरण कंपनीकडे ६३७० / रूपये भरून विद्युत मोटार साठी पुरवठा मागितला होता.
आज १७ वर्षापासून त्यांना विद्युत पुरवठा देण्यात आला नाही. मात्र त्याना ग्राहक क्र देऊन  वारंवार त्यांच्याकडे बिलाची लेखी मागणी केली जात आहे. मोतीराम केवट यांचे सन २०११ मध्ये त्यांचे निधन झाले आहे. त्यांनंतरही त्यांना विद्युत पुरवठा सुरु केला आहे . त्यांच्या मृत्यु नंतर त्यांच्या  वारसाना मार्च २०२४ पर्यंत जदळपास  दोन लाख एक हजार पाचशे साठ रुपये बिल देऊन वारसांना विद्युत मंडळाने सौम्य झटका दिला आहे . विद्युत पोल व तारा नसल्याने विद्युत पुरवठा दुरच त्यामुळे विदयुत न वापरले तरीही आलेले ते  बिल तात्काळ माफ करावे व विद्युत पोल व तारा जोडणी करून  विद्युत पुरवठा सुरु केला जावा . तसेच आजपर्यंत बागायती न होऊ शकल्याने कोरडवाहू शेती मुळे झालेले नुकसान सह इतर भरपाई करून विद्युत पुरवठा देण्याची मागणी लालमन केवट यांनी वरिष्ठांकडे वारंवार केली आहे . 
----
माझे कुटुंब अर्थिक दृष्ट्या कमकुवत असून माझ्या शेतात  सन २००० मध्ये वडील व माझ्या कुटुंबाने मेहनत मजुरी करत विहीर खोदकाम केले . २००७ मध्ये वडिलांनी कोटेशन पोटी ६३७० रुपये भरले . वडिलांचा मृत्यु होऊन १३ वर्ष झाले . परंतु लाईन मिळालीच नाही  मात्र बिल लाखो रुपयात आले . हा अन्याय कोण दुर करणार ? मला न्याय मिळावा .
--
लालमन केवट ( तक्रारदार शेतकरी ) वडोद बाजार
लालमन केवट यांच्या वडिलांनी कोटेशन भरले. मात्र त्यांना दोन पोलची गरज आहे. विद्युत पुरवठा जोडणी नाही. परंतु बिल येणे ही तांत्रिक चुक असावी. यासाठी वरिष्ठांना पत्रव्यवहार करून योग्य ती मदत केली जाईल. 
गुजर, विद्युत अभियंता पाथ्री

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच: हर्षवर्धन सपकाळ महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच: हर्षवर्धन सपकाळ
आधुनिक केसरी न्यूज मुंबई : नांदेड, दि. २८ ऑक्टोबरअतिवृष्टी व महापूरामुळे झालेल्या नुकसानीपोटी महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारने...
Breking News : अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापुरात आयसीस चा दहशतवादी जुबेर हंगरगेकर पयाला पुणे एटीएस ने केली अटक 
कार्तिकी एकादशी यात्रेसाठी एसटी सज्ज  ११५० जादा बसेस सोडणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
भिगवण कृषी उत्पन्न उपबाजारात आडतदारांचा अचानक संप; शेतकरी नाराज 
काँग्रेसची नाळ सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांबरोबर : सतेज पाटील
अंढेरा शिवारात जुळ्या मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या, आरोपी पित्याने वाशीम पोलिसात केले आत्मसमर्पण