रामेंद्रकुमार जोशी यांची नागपूरला पदोन्नतीवर बदली

रामेंद्रकुमार जोशी यांची नागपूरला पदोन्नतीवर बदली

आधुनिक केसरी न्यूज 

नाशिक : येथील राज्य वखार महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक रामेंद्रकुमार जोशी यांची नागपूरला सहआयुक्त ( प्रशासन ) वस्त्रोद्योग आयुक्तालय नागपूर या पदावर पदोन्नतीने बदली झाली आहे.
   रामेंद्रकुमार जोशी यांनी आजपर्यंत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सटाणा जिल्हा नाशिक , चोपडा जिल्हा जळगाव
पन्हाळा जिल्हा कोल्हापूर , दिंडोरी जिल्हा नाशिक ,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था म्हणून परभणी धुळे आणि नंदुरबार ,विभागीय उपनिबंधक दुग्ध, नाशिक ,प्रादेशिक उपसंचालक साखर अहमदनगर , प्राचार्य तथा संचालक राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्था तळेगाव दाभाडे जिल्हा पुणे , केंद्र शासनाच्या सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर फ्लावर्स या कार्यक्रमांतर्गत नेदरलँड येथे एक महिन्याचे विशेष प्रशिक्षण ,धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे प्रशासक म्हणून कामकाज , अवसायनातील सूतगिरणी साखर कारखाना बँका चे अवसायक म्हणून  उत्तम रित्या काम केले आहे जोशी हे शासकीय विद्यानिकेतन नाशिक धुळे येथे माजी विद्यार्थी असून त्यांच्या नागपूरला पदोन्नतीवर झालेल्या बदलीबाबत सर्वत्र अभिनंदन होत आहे लवकरच ते आपल्या पदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे जोशी यांनी आधुनिक केसरी च्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले .

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार
आधुनिक केसरी न्यूज चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास आज...
तुकूम येथे भीषण अपघात,आमदार किशोर जोरगेवार यांची घटनास्थळी पाहणी ; जखमींची रुग्णालयात जाऊन भेट
पाऊले चालती पंढरीची वाट ; श्रींच्या पालखीचे पंढरपूर वारीकरीता प्रस्थान..!
धुळ्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलत बनावट बियाणं केलं जप्त; जवळपास 20 लाखांचं बनावट बियाणं जप्त
जालना जिल्ह्यातील युवकाचा खून : चौघा संशयतांना पोलिसांनी घेतले ताब्यात 
ओडिशा राज्यातील वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची चंद्रपूर वन अकादमीला भेट
चंद्रपूरात 'संडे ऑन सायकल' अंतर्गत सायकल रॅलीचे आयोजन