आयुष्यभर फडणवीसांच्या डोक्याला गुलाल लागू देणार नाही;  मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल..म्हणाले -हिंमत असेल तर...

आयुष्यभर फडणवीसांच्या डोक्याला गुलाल लागू देणार नाही;  मनोज जरांगेंचा जोरदार हल्लाबोल..म्हणाले -हिंमत असेल तर...

आधुनिती केसरी न्यूज

परभणी :   देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्याशेजारी बसून उपोषण करावे. मग त्यांना कळेल उपोषण काय असते, हवा कुठून बाहेर जाते व कुठून श्वास घ्यावा लागतो,असे म्हणत  मनोज जरांगे यांनी  मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून  मंगळवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.  ते हिंगोली येथील दौऱ्यात जरांगेंनी फडणवीस यांच्या  डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू न देण्याचा निर्धारही जरांगे यांनी व्यक्त केला आहे.

वजन कमी करायचे असेल तर या

पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, माझे देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान आहे. त्यांनी हिंमत असेल तर 8 दिवस माझ्याशेजारी बसून उपोषण करावे. मग त्यांना कळेल उपोषण काय असते, हवा कुठून बाहेर जाते व कुठून श्वास घ्यावा लागतो. वजन कमी करायचे असेल तर या आणि माझ्यासोबत उपोषणाला बसा. मनोज जरांगे  सध्या परभणीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी एकाच दिवशी 5 ठिकाणी संवाद बैठका घेतल्या. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

मी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही..

पुढे जरांगे म्हणाले,  देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर आई-बहिणीविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप केला. त्यांना 2 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी लागलेली मुलगी आई-बहीण वाटली नाही का? त्यांनी त्यांना वाटेल ते करावे, मी आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आमच्या आया-बहिणींना आजही नीट चालता येत नाही. कारण, लाठीचार्जमध्ये त्यांना जबर मार लागला आहे. तेव्हा लाठीचार्जमध्ये त्यांना जबर मार लागला आहे. तेव्हा तुम्हाला आमच्या माता-भगिनी दिसल्या नाही का? तुम्ही लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर केवळ 10 दिवसांची निलंबनाची कारवाई केली. त्याचवेळी आम्हाला तुमची मराठ्यांविषयीची नियत दिसली, असे मनोज जरांगे म्हणाले.

मी अशांचा करेक्ट कार्यक्रम करतो- जरांगे

मनोज जरांगे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समाचार घेतला. माझी व देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली असताना एकनाथ शिंदे उगीचच मध्ये पडले. माझे मनोज जरांगेंशी कोणतेही देणेघेणे नाही. मी अशांचा करेक्ट कार्यक्रम करतो असे ते म्हणाले. पण आता मराठा समाजच आता असे बोलणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल. शिंदेंची मराठा समाजात इज्जत होती. पण त्यांनी समाजाला काय दिले? असे जरांगे म्हणाले. मी मरेपर्यंत माझ्या समाजबांधवांची साथ देईल. मी सगेसोयऱ्यांची मागणी सोडणार नाही.

10 टक्के आरक्षण देऊन  समाजाची फसवणूक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमच्याएवढा सन्मान कुणीच दिला नाही. त्यांनी 30 दिवस मागायचे आणि आम्ही त्यांना 40 दिवस द्यायचे. त्यांनी 2 महिने मागायचे आणि आम्ही अडीच महिने द्यायचे. आम्ही त्यांचा एकही शब्द खाली पडू दिला नाही. पण सरकारने आरक्षण दिले नाही. त्यांनी 10 टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली. त्यानंतरही मराठा समाजाला आजही एकनाथ शिंदेच आरक्षण देऊ शकतात असे वाटते, असे ते म्हणाले.

आता आयुष्यभर फडणवीस यांच्या डोक्याला गुलाल लागू देणार नाही - मनोज जरांगे

दुसरीकडे, हिंगोली येथील दौऱ्यात जरांगेंनी फडणवीस यांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लावू न देण्याचा निर्धार व्यक्त केला. सरकारने मराठा आरक्षणातील हिंसाचाराची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील वातावरण दूषित झाले आहे. जनतेत नाराजीची प्रचंड लाट आहे. ही चूक किती महागात पडेल हे फडणवीस यांच्या लक्षातही येणार नाही. ते किती खुनशी आहेत हे आम्हाला माहिती आहे, पण मराठे किती खुनशी आहेत हे त्यांना माहिती नाही. मराठा समाज आता आयुष्यभर फडणवीस यांच्या डोक्याला गुलाल लागू देणार नाही, असे मनोज जरांगे पाटील हिंगोलीच्या संवाद बैठकीत बोलताना म्हणाले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

ग्रामसेवकांने केला महिलेचा विनयभंग..! ग्रामसेवकांने केला महिलेचा विनयभंग..!
आधुनिक केसरी न्यूज सचिन सरतापे   म्हसवड सातारा :  ढाकणी तालुका- माण जिल्हा सातारा गावचे हद्दीत साबळेयांचे शेत नावाचे शिवारात मल्हारी...
आमदार किशोर जोरगेवार यांची मुख्यमंत्री महोदययांची मुंबई येथे भेट  
बँकेतील सहकारासाठी शिवसेना उबाठा जिल्हाध्यक्ष रवींद्र शिंदे भाजपात ; सीडीसीसी बँकेवर भाजपची सत्ता बसणार? 
अशोक चव्हाणांच्या मतदार संघात घड्याळाचा गजर ; नागनाथ घिसेवाड अजीत पवार गटात मुंबंईत पक्षप्रवेश  सोहळा
राजगड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी; ५६ मोबाईल व सोन्याची अंगठी परत मिळवून देत ५.४८ लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांकडे सुपूर्द
सकल मराठा समाजातर्फे क्रांतीचौक येथे भव्य निदर्शने
जायकवाडी धरणातून डाव्या कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडविण्याची आ.उढाण यांची मागणी