आ.झनकांच्या हस्ते मतदार संघात विकासकामांचा झंझावात; तब्बल 18 कोटींच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
आधुनिक केसरी न्यूज
विनोद पाटील बोडखे
रिसोड : रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी वाशिम यांच्या हस्ते आज दिनाक 10 मार्च रोजी सकाळी 9 वाजता तालुक्यातील ग्राम बोरखेडी येथून तब्बल 18 कोटी 15 लक्ष रुपयांच्या विकास कामांचा मतदारसंघात शुभारंभ करण्यात आला. यामध्ये बोरखेडी ते मोप रस्त्याची दर्जोन्नती करणे 2 कोटी 3 लक्ष रुपये, अर्थसंकल्पीय कामातून बोरखेडी ते वाकद रस्त्याची सुधारणा करणे 2 कोटी 58 लाख, बोरखेडी ते शेलु खडसे रस्त्याची सुधारणा करणे 1 कोटी 16 लाख रुपये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत प्रजिमा -60 अंतर्गत कण्हेरी रस्त्याची सुधारणा करणे 71लक्ष रू. तसेच बोरखेडी येथे आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत अण्णाभाऊ साठे सभागृह बांधकाम 10 लक्ष रू,रिसोड ते पवार वाडी रस्त्याची सुधारणा करणे 1कोटी 95 लक्ष,मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रिठद ते ढोरखेडा रस्ता करणे 5 कोटी 78 लक्ष, रिठद येथे आमदार विकास निधी अंतर्गत सिमेंट रस्ता 12 लक्ष रू,कोयाळी भिसडे येथे स्मशान भूमी सौंदर्यीकरण 7 लक्ष तसेच सभागृह बांधकाम 10 लक्ष,
तसेच मुख्य मंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत कोयाळी ते कोयाळी भिसडे ते वरूड तोफा रस्ता करणे 3 कोटी 38 लक्ष, असे एकूण 18 कोटी 15 लक्ष रुपयांचे भूमिपूजन रिसोड मतदार संघात करत आमदार अमित झनक यांनी एक प्रकारे विकास कामांचा झंझावात केल्याने मतदार संघातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिलीपराव सरनाईक महासचिव प्रदेश काँग्रेस,तसेच सभापती वैभव सरनाईक, संजय शिंदे,अमित खडसे, विष्णुपंत भुतेकर, राजाराम आरु, बाळासाहेब देशमुख, बबन गारडे, धनंजय बोरकर,विश्वनाथ सानप, डॉ रामेश्वर नरवाडे सचिन इप्पर,सोनू बाबा सरनाईक, बबन सानप,संतोष जाधव, अण्णा पाटील शिंदे,सुभाष बोरकर, रामेश्वर देवकर, शिवाजी काकडे प्रकाश वायभासे, गजानन आरु, दिनकर बोरकर,रमेश भिसडे, गोपाल खांनझोडे, पंढरी देवढे,घनशाम मापारी, रवी चोपडे, संजय सदार, बाबाराव ढोणे, अनिल शिंदे, पंजाब खडसे, बालाजी भिसडे, कैलास लांडगे, आत्माराम शिंगाडे,अर्जुन खरात,संतोष अंभोरे सतीश मानवतकर यांच्यासह विविध जिल्हा परिषद गणातील शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List