आमदार गोळीबार प्रकरण : राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले या गोष्टीची.....

आमदार गोळीबार प्रकरण : राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले या गोष्टीची.....

 आधुनिक  केसरी न्यूज

कल्याण : काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमध्ये  घडलेल्या गोळीबारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
राज ठाकरे यांनी  आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी म्हंटले की," कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की, ‘एखादा माणूस इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल? हे पण तपासले पाहिजे. इतपर्यंत एक माणूस जातो की तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो. त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल?. त्या माणसाची मानसिक स्थिती इतपर्यंत कोणी आणली याची पण सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. ती कोर्टामध्ये ते होईलच.असे ही ते यावेळी म्हणले.

या गोळीबाराच्या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच जणांना उल्हासनगर चोपडा कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आमदार गणपत गायकवाड यांना तळोजा कारागृहात पाठवण्यात आले आहे.

..तर ही घटना घडलीच नसती – वकील निलेश पांडे

गणपत गायकवाड यांचे वकील निलेश पांडे यांनी सांगितले की, ‘पोलिसांनी न्यायालयात पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. पण न्यायालायने पोलीस कोठडी नाकारली. पोलिसांनी जी कामगिरी आधी बजावयला हवी होती. आधीच एफआयआर नोंदवला गेला पाहिजे होता.

तब्बल 70 जणांच्या विरोधात जमीन बळकवण्याचा प्रयत्न

शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. जमिनीच्या वादातून हे प्रकरण घडले होते. महेश, गायकवाड, राहुल पाटील यांच्यासह तब्बल 70 जणांच्या विरोधात जमीन बळकवण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्या ठेकेदारांनी हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यासह 70 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांची देखील चौकशी केली जाणार आहे. 

Tags:
Adhunik Kesari Subscribe

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

'लाडकी बहिण' योजनेवर अजित पवारांचा मोठा खुलासा....वित्तविभागाचा विरोध असल्याच्या.... 'लाडकी बहिण' योजनेवर अजित पवारांचा मोठा खुलासा....वित्तविभागाचा विरोध असल्याच्या....
आधुनिक केसरी न्यूज  मुंबई : काही प्रसारमाध्यमांमध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या योजनेला वित्तविभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत,...
मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे भाष्य  : 'ही' आमच्या पक्षाची भूमिका...
उल्लेखनीय कामाची प्रशांसा आणि दुसऱ्याच दिवशी हवालदार सापळ्यात ;एवढ्या रुपयाची घेतली लाच...
आज अंगणवाड्या शाळा, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस बंद ; जिल्हाधिका-यांनी निर्गमित केले आदेश
गडचिरोली जिल्ह्यात पुरांचा पाऊस , पुरामुळे तब्बल 50 मार्ग बंद! जीवनाआवश्यक वस्तूचा तुटवडा
मानवतेचा पूजक हरपला : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते , सरचिटणीस विलास मानेकर
माणुसकीला काळीमा साईनाथ रुग्णालयात आढळले जन्मलेल मृत अर्भक, वाचून थक्क व्हाल