बल्लारपूर तालुक्यातील अवैध वाळू तस्करी वाढतेय! तीन ट्रॅक्टर अवैध वाळू ची वाहतूक करताना जप्त..
आधुनिक केसरी न्यूज
बल्लारपूर : शहरात रात्रभर अवैध वाळू तस्करी सुरू असूनही कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे वाळू तस्करांचे वाढते मनोधैर्य वाढत चालले आहे. दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे यांनी केले. दहेली गावाजवळ वाळूने भरलेले तीन ट्रॅक्टर जप्त केले आहे.
दहेली गावाजवळ तीन ट्रॅक्टर अवैध वाळू ची वाहतूक करताना पकडले. कारवाई दरम्यान आरोपी पळून जाण्यात यशस्वी, वाळूने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक MH34 AP 3326 व ट्रॉली क्रमांक MH 34 एबी 2831, MH 34 AP 5388 व ट्रॉली क्रमांक MH 34 AP 2154 व MH 34 CC 1429 व विना नंबर ची ट्रॉली जप्त केली आहे. .वरील कारवाईसाठी बल्लारपूर तहसील कार्यालयात ठेवण्यात आले आहेत.जप्त केलेल्या प्रत्येक ट्रॅक्टर ट्रॉलीवर सुमारे एक लाख दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाळू तस्करीत गुंतलेल्या तीन ट्रॅक्टरचे मालक अनुक्रमे आरिफ खान, इलियास खान व करीम आसिफ खान हे तिघेही बल्लारपूरचे रहिवासी असल्याची माहिती तहसील कार्यालयातील सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव न झाल्यामुळे अवैध वाळू तस्करीला चालना मिळत आहे. तहसीलदार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासाची कार्यवाही सुरु आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List