दहावी - बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमीः परीक्षा सुरू होण्याच्या.....
आधुनिक केसरी न्यूज
पुणे : करिअरच्या दृष्टीने इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या महत्त्वाचा टप्पा मानला जातो. इयत्ता दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी देण्यात येणार आहे. म्हणजेच आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे अधिकचा वेळ मिळणार आहे.
पालक देखील या परीक्षांकडे गांभीर्याने लक्ष देत असतात. मात्र, या परीक्षा निकोप आणि भयमुक्त तसेच कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी परीक्षा मंडळ सातत्याने प्रयत्न करत असतो. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका शांततेत पूर्ण वाचण्यास वेळ मिळावा यासाठी परीक्षा सुरू होण्याच्या आधी दहा मिनिटे प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका समजून घेण्यास मदत होईल.
वास्तविक फेब्रुवारी - मार्च 2023 मध्ये निर्धारीत वेळापूर्वी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याची सुविधा रद्द करण्यात आली होती. मात्र, आता पालक आणि विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून हा निर्णय पुन्हा एकदा घेण्यात आला आहे.
'या' नऊ विभागीय मंडळामार्फत होणार परीक्षा...
इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीमध्ये होणार आहे. तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा एक मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. फेब्रुवारी - मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना आता दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar


Comment List