शैक्षणिक क्षेत्रातील धार्मिकता

शैक्षणिक क्षेत्रातील धार्मिकता

शाळा,महाविद्यालयात धार्मिकता नको असे सर्वजण म्हणतात.शासन,राजकारणी, समाजकारणी, न्याय देणारे कोर्ट व इतर सर्वजण बेंबीच्या देठापासून सांगतात. शासन स्तरावरही विविध प्रकारचे जी.आर काढून सर्वधर्म समभाव असणारे कार्यक्रम घ्यावेत असे सांगितले जाते.हे खरेही आहे.कारण शाळा, महाविद्यालयातूनच नानाविध संस्कारांच्या माध्यमातून मानवतेचे बीज पेरले जात असते.देशासाठी उत्तम नागरिक घडवला जातो.शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे. परंतु शैक्षणिक क्षेत्रातील,शाळा,… Continue reading शैक्षणिक क्षेत्रातील धार्मिकता

शाळा,महाविद्यालयात धार्मिकता नको असे सर्वजण म्हणतात.शासन,राजकारणी, समाजकारणी, न्याय देणारे कोर्ट व इतर सर्वजण बेंबीच्या देठापासून सांगतात. शासन स्तरावरही विविध प्रकारचे जी.आर काढून सर्वधर्म समभाव असणारे कार्यक्रम घ्यावेत असे सांगितले जाते.हे खरेही आहे.कारण शाळा, महाविद्यालयातूनच नानाविध संस्कारांच्या माध्यमातून मानवतेचे बीज पेरले जात असते.देशासाठी उत्तम नागरिक घडवला जातो.शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे. परंतु शैक्षणिक क्षेत्रातील,शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ व शैक्षणिक कार्यालयातील परस्थिती अतिशय वाईट आहे. विषमता निर्माण करणारी आहे. जातीयतेला पोषक वातावरण निर्मिती करणारी आहे. हे मात्र शासनाला किंवा कोर्टाला का दिसत नसावे?दिसत असूनही अनेक वेळा त्यांच्याकडून डोळेझाक केली जाते असेच चित्र दिसते. याला काय म्हणावे? अनेक प्रकारची प्रकरणे, अनेक प्रकारच्या तक्रारी शासकीय अधिकारी यांच्याकडे व कोर्टातही दाखल केल्या जातात. परंतु यामधून किती तक्रारींचा निपटारा केला जातो. किती प्रकारणात योग्य न्याय दिला जातो हा खरा संशोधनाचा विषय आहे.
भारतीय संविधानाने खरेतर प्रत्येकाला आपआपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की तो धर्म शाळा,महाविद्यालयात आणावा? हिजाब शाळा, महाविद्यालयात घालून यावा की नाही यावरून देशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर रणकंदन माजले आहे. त्यावरूनही प्रचंड मोठ्या प्रमाणावर राजकारण केले जाते आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. देशाला शरमेने मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. आज देशात असे अनेक शाळा महाविद्यालये आहेत की समतेचे तत्त्व किंवा भारतीय संविधानाची अंमलबजावणी करताना दिसत नाहीत. उलट त्यांच्याकडून संविधानाच्या नियमांची पायमल्ली होताना दिसते आहे. अनेक शाळा,महाविद्यालयांमधून जातीयता पोसली जाते. विषमता निर्माण केली जाते. अन्याय अत्याचार कर्मचार्‍यावर केला जातो. त्याच बरोबर अनेक शाळा,महाविद्यालयामधून देव देवतांच्या प्रार्थना गायल्या जातात. अनेक शाळा, महाविद्यालयात व शासकीय कार्यालयात देवी-देवतांचे फोटो लावलेली असतात. शाळा महाविद्यालयाच्या प्रांगणात मध्येही विविध प्रकारचे मंदिरे दिसून येतात. ज्या शाळा,महाविद्यालयात समाजसुधारकांचे फोटो विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी असायला हवेत तिथे मात्र त्यांचे फोटो जातीय द्वेषातून लावले जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. हे मात्र कोणत्या विचारधारेत बसणारे आहे? अनेक आश्रमशाळेत व वसतिगृहात विद्यार्थ्यांना रोज सकाळी पहाटे उठून व जेवणावेळी विशिष्ट धर्माची प्रार्थना म्हणायला लावली जाते. अनेक शाळा, महाविद्यालयातून विशिष्ट समाजसुधारकांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजरी केल्या जातात व अनेक समाजसुधारकांना मुद्दामहून जातीय धर्मीय दोषातून डावलले जाते. यावर मात्र कोणीही बोलायला तयार होत नाहीत. अनेक शाळा महाविद्यालयाचे पोशाखही विशिष्ट धर्माच्या रंगाचे असल्यासारखे दिसायला लागतात. कार्यक्रमाच्या शेवटी किंवा सुरुवातीला राष्ट्रगीताने सुरुवात व सांगता करावी असे शासनाने सांगितले असतानाही अनेक शाळा महाविद्यालये दुसरी धर्मीय प्रार्थना म्हणतात व जातीय,धर्माला खतपाणी घालताना दिसतात. यावेळी मात्र अशा कार्यक्रमाला अधिकारीही उपस्थित असतात त्याचे काय करायचे? शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयातून सर्रास सत्तेचा, पदाचा दुरुपयोग करून अशा पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून एका विशिष्ट धर्माचीच गाणे गायली जातात. अशा अनेक बाबीवरून अनेक वेळा भांडणे होतात, जातीय व धार्मिक द्वेष पसरला जातो. याविषयी अनेक प्रकरणे पोलीस ठाण्यात जातात, कोर्टात जातात परंतु तिथूनही योग्य न्याय मिळताना दिसत नाही.त्यामुळे अशी प्रकरणे कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत.
शाळा,महाविद्यालये व विद्यापीठे ही खऱ्या अर्थाने संस्काराची केंद्रे असतात. इथेच बालपणापासून विद्यार्थ्यावर सुसंस्कार केले जातात. देशाचा उत्तम नागरिक बनविण्याचे कार्य शाळा,महाविद्यालयातून केले जात असते. बालपणापासून विद्यार्थ्यांना चांगले संस्कार मिळाले तर तो समाजाचा,देशाचा चांगल्या प्रकारचा आधारस्तंभ बनत असतो. देशाचा उत्तम नागरिक बनविणे हे शाळा महाविद्यालयाचे काम आहे. शासनाकडूनही शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रचंड आर्थिक तरतूद केली जाते. शाळा,महाविद्यालय व प्रशासकीय कार्यालय इथून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य देशाच्या दृष्टिकोनातून घडायला हवे. पण हल्ली तसे होताना दिसत नाही उलट शाळा,महाविद्यालय व प्रशासकीय कार्यालये ही जाती-धर्माचे अड्डे बनत चालले आहेत. विषमतेचे केंद्र बनत चालले आहेत. इथेच सर्वसामान्य माणसांचे, गोर गरिबांचे, दिन दलितांचे, कर्मचाऱ्यांचे आणि नोकरदारांचे फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे जीवघेणे शोषण केले जात आहे. यामध्ये सर्वसामान्य माणसांचे अनेकांचे संसार, जीवन उद्ध्वस्त केले जातात याची ना शासनाला फिकीर ना कुणाला फिकीर. शासन लोककल्याणकारी असते. लोकांचे कल्याण शासनाकडून साधले गेले पाहिजे पण तसे होताना दिसत नाही.हे समाजहिताच्या आणि देशहिताच्या दृष्टीने फार घातक गोष्ट आहे. देशाच्या, राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व इतर विकासाच्या संदर्भात मोठमोठ्या वल्गना केल्या जातात परंतु वस्तुस्थिती तशी काहीच नसते. आज शाळा,महाविद्यालयाची दयनीय अवस्था आहे. नोकर भरती बंद आहे. अनेक शाळा,महाविद्यालय बंद पडत आहेत. अनुदान बंद केले आहे. बोगस नोकर भरती केलेलेही प्रकरणे भरपूर आहेत. या अशा अनेक गोष्टीविषयी मात्र कोणीही बोलायला तयार नाही. लिहायला तयार नाही. जे नोकरीत आहेत त्यांच्यावरही विविध विषमतेच्या माध्यमातून विविध प्रकारचे अन्याय-अत्याचार केले जातात. त्याची कुठेच दाद ना फिर्याद आहे. या साऱ्या गोष्टीकडे सरकारचेही लक्ष नाही. खरे तर या देशात काय चालू आहे तेच कळत नाही. शाळा, महाविद्यालयातून व शैक्षणिक क्षेत्रातून ज्या गोष्टी घडायला नको आहेत त्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर घडल्या जात आहेत.त्याकडे मात्र सरकारचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अनावश्यक गोष्टीकडे मात्र जाणून बुजून लक्ष केंद्रित करून सामान्य जनतेची फसवणूक केली जात आहे. खरेतर कपड्यावरून एवढे वाद-विवाद करण्यापेक्षा शैक्षणिक सुधारणा कशी होईल, शैक्षणिक क्षेत्रातून विविध कार्यालयातून राष्ट्रीय एकात्मतेची निर्मिती कशी करता येईल व भारतीय संविधानाची अंमलबजावणी कशी करता येईल याकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे.

प्रा. डॉ. सतीश मस्के
मराठी विभागप्रमुख,
कर्म. आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर ता. साक्री जि धुळे 424306
मो.9423397484

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

मंगळवेढ्यात नरबळीचा  प्रकार? १० फूट खोल खोदलेला खड्डा , कर्नाटकच्या विजापुर मधून मांत्रिक आणला आणि नशेत असलेला तरुण  मिळाला  मंगळवेढ्यात नरबळीचा  प्रकार? १० फूट खोल खोदलेला खड्डा , कर्नाटकच्या विजापुर मधून मांत्रिक आणला आणि नशेत असलेला तरुण  मिळाला 
आधुनिक केसरी न्यूज  महेश गायकवाड  सोलापूर : जिल्ह्यातील मंगळवेढ्यात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'नरबळी'चा संशय या प्रकरणात...
आ. करण देवतळे यांची ताडोबा सफारी..!
प्रेमजाळ्यात अडकवून तरुणाकडून लाखोंची उकळपट्टी; पैशांसाठी विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न
श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी
गिझरच्या विद्युत धक्क्याने तरुण व्यावसायिकाचा मृत्यू; गडचिरोलीत शोककळा
नांदेड येथे टोळी युद्धाचा भडका: तीन गुन्हेगारांचा खुन 
गॅस टँकरमधून अवैधरीत्या गॅसची चोरी; पुरवठा विभागाची टोळीवर कारवाई; १.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त