बेवड्या, पिऊन किडन्या खराब; तु तुझी तब्येत सांभाळ!: छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर जहरी टीका.....काय- काय म्हणाले वाचा सविस्तर

बेवड्या, पिऊन किडन्या खराब; तु तुझी तब्येत सांभाळ!: छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर जहरी टीका.....काय- काय म्हणाले वाचा सविस्तर

आधुनिक केसरी न्यूज

भिवंडी: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापला आहे. त्यातच मनोज जरांगे आणी छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक वाद वाढतच चालला आहे. मंत्री छगन भुजबळ यांचा मराठा समाजाला ओबीसी आरक्षणातून आरक्षण देण्यास विरोध आहे. त्यामुळे याच्यात शाब्दिक चकमकी होतच असतात. आज छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर जहरी टिका केली आहे. ते,म्हणाले की, "मी छगन भुजबळांचा कार्यक्रम करणार अशी धमकी काय देतो जरांगे. जे-जे ओबीसीविरोधात बोलतात त्यांचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये कार्यक्रम करा, ठिकठिकाणी मोर्चे काढा, कँडल मार्च काढा. लढाईसाठी सज्ज व्हा. असे आवाहन छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजबांधवांना केले. भिवंडी येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते.
बेवड्या पिऊन पिऊन खराब झालेल्या किडण्या....
पुढे भुजबळ म्हणाले, कुणीतरी जरांगेला जाऊ सांगा की, दादागिरी करणे चूक आहे. जाळपोय करणं चुकीचं आहे, गुन्हे मागे घ्या, असा दबाव टाकणे चूक आहे. सरकारला इशारा देणे चुकीचे आहे. कुणीतरी याला सांगा की, तुझी तब्येत सांभाळ, बेवड्या पिऊन पिऊन खराब झालेल्या किडण्या आधी सांभाळ, असे म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
आधीच माकड त्याच्यात बेवडा प्याला'
भुजबळ पुढे म्हणाले की, 'आधीच माकड त्याच्यात बेवडा प्याला' असा उल्लेख करत त्यांनी जरांगेंवर पुन्हा निशाणा साधला. माझा कार्यक्रम करणार, 24 तारखेनंतर बघू, अश्या धमक्या चालणार नाही. महाराष्ट्रात अजिबात दादागिरी चालणार नाही. असे ही भुजबळ यांनी म्हंटले आहे.
दुसरीकडे दादागिरी करून बळजबरी
भुजबळ पुढे म्हणाले की, आमची लायकी काढता अन् ओबीसीमधून आरक्षण मागत आहात. एकीकडे बाळासाहेब सराटे न्यायालयात याचिका टाकून आम्हाला ओबीसीतून हाकलून लावत आहे. तर दुसरीकडे दादागिरी करून बळजबरी ओबीसी प्रमाणपत्र दिले जात आहेत. जस्टीस शिंदे समिती एकप्रकारे चुकीचे काम करु लागली आहे. आमची मुलं हुशार आहेत. त्यामुळे त्यांना सगळं मिळत आहे. त्यांच्या कतृत्वाने ते मिळवत
पण खोटी प्रमाणपत्र घेतली
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले की, आज काल काय चाललंय छत्रपती शिवाजी, महाराज की जय म्हणायचे आणि आमच्यावर हल्ले करायचे. छत्रपतींचा इतिहास हा मावळे म्हणून लिहला जातोय मराठा म्हणून केला जात नाही. मावळ्यांमध्ये सर्वच होते. मांग, माळी, महार, न्हावी, कोळी, मुस्लिम या समाजातील अनेक लोकांनी महाराजांना साथ दिली. आमचं म्हणणे एवढंच आहे. सारथीला देता ते आम्हाला द्या, 54 टक्के म्हटले तर साडे सात कोटी लोक हे ओबीसी आहेत. काहीही करायचं आणि काहीही बोलायचं. मराठा समाजाला आरक्षण द्या पण खोटी प्रमाणपत्र घेतली त्यात बाजूला काढून टाका. असे ही ते म्हणाले आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
आधुनिक केसरी न्यूज बजरंगसिंह हजारी माहूर : दि.१२ मे तालुक्यातील वाई बाजार येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीला कंटाळून तब्बल चारशे...
५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान
मोठी बातमी : सी-60 चा पराक्रम : गडचिरोलीत माओवादी तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त
'महापंचायती' ला उदंड प्रतिसाद व अभुतपूर्व यश
पालकमंत्र्यांकडून इरई नदी खोलीकरण कामाची पाहणी : कामाची गती वाढविण्याचे निर्देश
आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलेला वाव ; उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा  समारोप
'त्या' हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा : विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार