वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्याची आत्महत्या
अहमदनगर: डॉ, गणेश शेळके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली
अहमदनगर: कला दिग्दर्शक राजु सापते यांनी दोन दिवसांपूर्वीच पुणे येथे पिंपरी- चिंचवड येथे लेबर युनियनच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली त्या पाठोपाठ अहमदनगरजिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी उपकेंद्रात नियमित लसीकरण सुरु असताना डॉ, गणेश शेळके वय ४०,यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी 1 च्या दरम्यान घडली. ही आत्महत्या वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून केली असल्याची सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे यामुळे आरोग्य विभागामध्ये एकच खळबळ उडाली असुन या प्रकरणात कोण कोण दोषी आहेत व त्या दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे -डॉ, गणेश शेळके यांनी लिहिलेली सुसाईड नोट “मी डॉ गणेश गोवर्धन शेळके आत्महत्या करत आहे यास कारणीभूत तालुका वैद्यकीय अधिकारी,भगवान दराडे व प्रशासकीय सेवेतील तहसीलदार व कलेक्टर जबाबदार आहेत” वेळेत पेमेंट न करणे,कामाचा अतिरिक्त भार व पेमेंट कपातीची धमकी देणे या कारणास्तव आत्महत्या करत आहे सरकारने कोविड काळात सामुदायिक आरोग्य अधिकारी पदाची नियुक्ती प्रत्येक तालुक्यातील उपकेंद्रात केली आहे परंतु प्रत्येक जिल्ह्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी हे त्यांच्या सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांना कशी वागणूक देतात,तसेच कामाच्या बाबतीत कशी पिळवणूक करतात,कामावरून कमी करण्याची धमकी देतात,विनाकारण पगार कपात करतात,तसेचबोलावलेल्या मिटिंग मध्ये सर्वांसमोर अपमान करतात,नियुक्ती झालेल्या उपकेंद्रासोबतच प्रमुख केंद्रात काम करण्याची सक्ती करतात या सर्व जाचामुळे सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांचे खूपच हाल होत आहेत खरे तर ते राजीनामाही देवू शकत नाहीत कारण त्यांच्याकडून एक लाख रुपयांचा बॉण्ड लिहून घेतलेला आहे कोविड काळामध्ये रुग्णांची आर,टी,पी,सी,आर तपासणी,लसीकरण,मुलांचे लसीकरण,गरोदर माता व बालसंगोपन असे बरेच कामे करावी लागतात वत्याचा रोज। अहवाल पाठवावा लागतो एवढे कष्ट करूनही वरचे अधिकारी त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्रास देतात या सर्व बाबींची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar





Comment List