Video : राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि समिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सत्कार

Video  : राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि समिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सत्कार

 

आधुनिक केसरी न्यूज 

मुंबई : राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि समिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच पुढील वाटचालीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालेल्या सत्कार कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष यदु जोशी, दैनिक पुढारीचे पत्रकार उदय तानपाठक, दिलीप सपाटे, नवशक्तीचे संपादक संजय मलमे, नवाकाळच्या नेहा पुरव,  आयबीएन लोकमत गडचिरोलीचे महेश तिवारी आदी पत्रकार उपस्थित होते.

यदु जोशी आणि सदस्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी पत्रकारांची निवृत्ती वेतनवाढ, निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्यसुविधा, बैठकांसाठी मानधन, प्रवासभत्तावाढ आदी प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

पत्रकारांच्या मागण्यांबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यसरकार सकारात्मक विचार करेल. अर्थ विभागाचे त्याला सहकार्य असेल, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार व राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि समिती सदस्यांना दिले.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई बंडगार्डन पोलिस ठाण्यातील PSI विरुद्ध लाच मागणीचा गुन्हा; एसीबीची कारवाई
आधुनिक केसरी न्यूज  संदीप शेलार पुणे : दि.9 मार्च 2026 फसवणुकीच्या तक्रारीत गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडे लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी...
नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या  कार्यालयात 
नांदेड बसस्थानकात बाॅब ब्लास्टची अफवा पसरल्याने खळबळ बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील एकास अटक 
बाफना टी पॉईंट येथे आग : ३ वाहने जळून खाक
उमाप यांच्या पथकांची माळकौठा येथील वाळू घाटावर धाड १ कोटी ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 
खाजगी वसतीगृहातील मुलीची गळफास लावून आत्महत्या; मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुलींच्या नातेवाइकांचा नकार 
माओवादी चळवळीला मोठा धक्का? वरिष्ठ नेता ‘गणपती’ नेपाळमध्ये ताब्यात असल्याची चर्चा