भाऊ बहिणीचे अतूट नाते! भावाने चक्क किडनीदान करून,बहिणीचे वाचले प्राण

भाऊ बहिणीचे अतूट नाते! भावाने चक्क किडनीदान करून,बहिणीचे वाचले प्राण

आधुनिक केसरी न्यूज

पुणे : रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणींमधील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. बुधवारी (दि. ३०) हा उत्सव साजरा होत आहे. याच दिवशी बहीण लाडक्या भाऊरायाला राखी बांधते आणि भाऊदेखील बहिणीसाठी वेळप्रसंगी कोणताही त्याग करण्यासाठी तयार होतो. असेच एक उदाहरण पुण्यातील बहीण- भावाचे आहे. किडनी निकामी झालेल्या बहिणीला किडनीचे दान करून भाऊरायाने तिचा जीव वाचवला. रक्षाबंधनानिमित्त बहीण-भावाची अतूट जिव्हाळ्याची ही गोष्ट आहे.

एज्युकेशन कन्सल्टंट असलेले स्मित विनायकराव रणनवरे (वय ३७, रा. बाणेर) यांनी त्यांची मोठी बहीण पारूल वैभव पिसाळ (वय ४५, रा. पद्मावती) यांना स्वत:ची किडनी दान केली. जहांगीर हॉस्पिटलमध्ये २३ जुलै २०१८ रोजी ही किडनी पारूल यांच्यावर शस्त्रक्रियेद्वारे प्रत्यारोपित करण्यात आली. तेव्हापासून दोघांचीही तब्येत अगदी ठणठणीत आहे. किडनी प्रत्यारोपणानंतर त्यांच्यासाठी आजचे हे सहावे रक्षाबंधन आहे.

पारूल या गृहिणी आहेत. त्यांचे २०१७ ला वजन कमी व्हायला लागले. तेव्हा त्यांचे पती वैभव पिसाळ यांनी संपूर्ण तपासण्या केल्या. या रिपोर्टमध्ये त्यांचे हिमोग्लोबिन कमी झाले होते. तर लघवीतील क्रियाटिनीन या घटकाचे प्रमाण ३.५ वर (जे १ च्या आत हवे) गेले होते. त्यांनी सातारा रस्त्यावरील खासगी रुग्णालयात मूत्ररोगतज्ज्ञ डॉ. सुनील जावळे यांना दाखवले. आणखी तपासण्या केल्यावर पारूल यांना 'क्रॉनिक किडनी डिसिज' असल्याचे निदान झाले. त्यावर सुरुवातीला पाच ते सहा महिने गोळ्या घेतल्या; परंतु, क्रियाटिनीन ८ ते ९ इतके वाढले. डायलिसिस मागे लागले. डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपण करण्याचा पर्याय समोर ठेवला.

किडनी कोण देणार, असा शोध सुरू झाला तेव्हा स्मित स्वत:हून पुढे आला आणि बहिणीसाठी कोणताही विचार न करता किडनी द्यायला तयार झाला. जहांगीर हॉस्पिटलमध्ये डॉ. सुनील जावळे, डॉ. दीपक किरपेकर यांनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. येथील प्रत्यारोपण समन्वयक मनोज गाडेकर यांनी समुपदेशन केले. यासाठी पाच ते सहा लाख खर्च झाला. आता दोघांचीही तब्येत ठीक आहे, अशी माहिती पारूल यांचे पती वैभव पिसाळ यांनी दिली.

आम्ही चौघी मोठ्या बहिणी असून स्मित हा आमचा सर्वांत लहान आणि एकुलता एक भाऊ आहे. काही दिवस मी डायलिसिसवर होते. हे पाहून माझ्यापेक्षा लहान असताना, त्याचे लग्नही झालेले नसताना स्वत:चा कोणताही विचार न करता त्याने मला किडनी देण्याचा कठोर निर्णय घेतला. स्मित प्रत्येक रक्षाबंधनाला राखी बांधायला येतो. 

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या कर्जबाजारीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
आधुनिक केसरी न्यूज बजरंगसिंह हजारी माहूर : दि.१२ मे तालुक्यातील वाई बाजार येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीला कंटाळून तब्बल चारशे...
५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान
मोठी बातमी : सी-60 चा पराक्रम : गडचिरोलीत माओवादी तळ उद्ध्वस्त, मोठा शस्त्रसाठा जप्त
'महापंचायती' ला उदंड प्रतिसाद व अभुतपूर्व यश
पालकमंत्र्यांकडून इरई नदी खोलीकरण कामाची पाहणी : कामाची गती वाढविण्याचे निर्देश
आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलेला वाव ; उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा  समारोप
'त्या' हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा : विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार