चंद्रभागाचे पाणी आरोग्यासाठी धोकायदायक
पंढरपूर : कोरोनामुळे वारकरी संप्रदायातील तब्बल ६ वारींवर निर्बंध लागू असल्याने रद्द झाल्यानंतर आज माघशुध्द एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढपुरमध्ये दाखल झाले आहेत. माघी वारीचा मुख्य सोहळा म्हणजेच माघी एकादशीनिमित्त साजरा होत असून मराठी वर्षांतील शेवटची आणि वारकरी संप्रदयातील महत्त्वाची मानली जाणारी माघी वारी ही शेवटची असते. या वारीसाठी तळ कोकण, कोकण, मुंबई,… Continue reading चंद्रभागाचे पाणी आरोग्यासाठी धोकायदायक
पंढरपूर : कोरोनामुळे वारकरी संप्रदायातील तब्बल ६ वारींवर निर्बंध लागू असल्याने रद्द झाल्यानंतर आज माघशुध्द एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी पंढपुरमध्ये दाखल झाले आहेत. माघी वारीचा मुख्य सोहळा म्हणजेच माघी एकादशीनिमित्त साजरा होत असून मराठी वर्षांतील शेवटची आणि वारकरी संप्रदयातील महत्त्वाची मानली जाणारी माघी वारी ही शेवटची असते. या वारीसाठी तळ कोकण, कोकण, मुंबई, मराठवाडा येथून भाविक न चुकता वारीला येतात आणि चंद्रभागेमध्ये स्थान करतात. मात्र यंदा याच चंद्रभागा नदीचं पाणी हे तिर्थ म्हणूनच काय तर अंघोळ करण्यासाठीही धोकादायक असल्याची माहिती समोर आलीय.
भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अवहालामध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. हे पाणी तिर्थ म्हणून पिऊ नये असं आवाहन सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या गणेश अंकुरराव यांनी केलंय. गणेश यांनीच या पाण्याचे काही नमुने चाचणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल समोर आला असून त्यामधून नदीचं पाणी हे मानवी आरोग्यासाठी धोकायदाक असल्याचा निष्कर्ष समोर आलाय. माघी एकादशीनिमित्त पंढरपुरमध्ये तीन लाखांच्या आसपास भाविक दाखल झालेले असतानाच ही माहिती समोर आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List