Video : धुळ्याच्या मल्लांनी विविध गटात एक सुवर्ण, 2 रौप्य तर 3 कास्य पदक पटकावले

Video  : धुळ्याच्या मल्लांनी विविध गटात एक सुवर्ण, 2 रौप्य तर 3 कास्य पदक पटकावले

 

आधुनिक केसरी न्यूज 

आकाश सोनवणे 

धुळे  : क्रीडा व युवक संचालनालय, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथील गरुड मैदानावर आयोजित राज्यस्तरीय स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचा  सायंकाळी समारोप झाला. 

तीन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत फ्री स्टाईल, ग्रीको रोमन, महिला संघ या तीन प्रकारात आणि विविध दहा वजनी गटात या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 30 संघ आणि  650 पेक्षा अधिक कुस्तीपटू, प्रशिक्षक सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी गरूड मैदानावर तीन मॅटचे आखाडे तयार करण्यात आले होते, तर स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या होत्या. 19 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर धुळ्यात या स्पर्धा होत असल्याने धुळेकरांनी कुस्तीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.या स्पर्धेच्या आयोजनासाठी धुळे महानगरपालिका, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्थांचे आर्थिक  सहाय्य लाभले. 

या स्पर्धेत ग्रिकोरोमन प्रकारात 67 किलो वजनी गटात धुळ्याच्या रोहित शिंदे ला कास्य पदक, महिला प्रकारात 55 किलो वजनी गटात साक्षी शिंदे ला कास्य पदक तर फ्री स्टाईल प्रकारात 74 किलो वजनगटात जतीन आवाळेला सुवर्ण पदक, 61 किलो वजनी गटात नाबील शहा ला रौप्य पदक, 92 किलो वजनगटात द्रविड आघाव ला रौप्य पदक तर 79 किलो वजनगटात प्रशांत फटकाळ ला कास्य पदक मिळाले आहेत.

Tags:

About The Author

Related Posts

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..! भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला..!
आधुनिक केसरी न्यूज  गोंदिया :  गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरातील बांध तलाव येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर भरदिवसा प्राणघातक...
लग्नाचे आमिष, फोटो व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवरील कथित लैंगिक अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा
जाखमाथ्याजवळ भीषण अपघात स्कुटीला पाठीमागून पल्सरची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, एक जखमी
गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरांच्या त्रासाला कंटाळून  शिक्षकांची दोन मुलासह नदीत कार घालून आत्महत्या 
विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवारांच्या अल्टिमेटमपुढे प्रशासन नरमले
योजना पूर्ण करून शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मंदिर परिसरातील भू-संपादन अखेर यशस्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने दुकानदारांना मिळणार मालकी हक्काची जागा..!