गावरान आंबा नामशेष होण्याच्या मार्गावर..!

बाजार पेठेत कर्नाटकी केसर, बदाम, हापूस आंब्याची चलती

गावरान आंबा नामशेष होण्याच्या मार्गावर..!

 आधुनिक केसरी न्यूज 

कन्नड :कन्नड तालुका हा बग़ायती क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने ओळखला जातो, तालुक्यातील ग्रामीण भागात मोठया प्रमाणात फळांच्या बागा लावण्यात आल्या आहेत. चीकू,अंबा, चिंच,जाम, मोसंबी, लिंबू,या प्रजातीचे झाड़े मोठ्या प्रमाणात आहेत,तसेच तालुक्याच्या बहुतांश ठिकाणी निजाम कालीन आंब्याची झाडे आतापर्यत उपलब्ध होते, त्या झाडांपासून हंगामी आंबे एका झाडांचे ट्रैक्टर भरून निघायचे मात्र काळ बदलत असल्याने भाऊ बंधकीच्या शेताच्या वाटण्या होऊन वाटण्यात आलेल्या बांधावरील आंब्यांची झाडे नष्ट करून पिके घेण्यात येऊ लागले आहेत. ओडा, नदी, विहारीवरील पिकांना मारक ठरणारे आंब्याची झाडे तोडण्यात येऊ लागली आहेत, त्यासोबतच रस्ता रुंदीकरणात येणारे आंब्याची झाडे पण तोडण्यात आली आहेत. वादळी पावसाचा देखील फटका बसत आहे. एकेकाळी कन्नड तालुक्यातील मोठ मोठाल्या आमराया जिल्ह्यात न्हवे तर राज्यात प्रसिद्ध होत्या. दूर -दूरचे व्यापारी वर्ग या ठिकाणी आंबे खरेदी करण्यासाठी येत होते. मात्र आता नामशेष आंब्याच्या झाडांचा सूपड़ा साफ झाल्यामुळे गावरान आंबा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या कोकण आणि  कर्नाटकातील वेगवेगळ्या आंब्यांनी मार्केटवर कब्जा मिळवल्याने गावातील विविध प्रकारच्या चविने गोडी निर्माण केलेल्या गावरान आंबे सध्या झाडावरच पिकून नष्ट होऊ लागली आहेत.त्यामुळे रासायनिक औषधे आणि खतांचा वारेमाप वापर करून उत्पादित केलेल्या आंब्याची बाजारात मोठ्या प्रमानात मागणी होत आहे.भविष्यात गावरान आंबा दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आहे.गावोगावी घरोघरी भाऊबंदकी मोठ्या प्रमाणात उचल  खाऊ लागली आहे, शेतातील बांधाच्या कारणावरून आणि बांधाच्या हददीवरून सरासरी रोजच वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.वाद विकोपाला जाऊ नये म्हणून पोलिसात दाद मागावी लागत आहे. बांधावर असलेल्या आंब्याचे झाड आणि दोन्ही हद्दीतील असलेले बांध बहुतेक वेळा वादाचे कारण ठरत आहेत. त्यामुळे बांधावरची आंब्याचे झाडे तोडून पिके घेण्याकडे शेतकऱ्यचा कल  निर्माण होऊ लागला आहे, झाडाच्या खाली पिके येत नाहीत म्हणून देखील आंब्याचे झाड व इतर झाड तोडले जात आहेत, तलाव- नदी  या ठिकाणी असलेल्या झाडाखालील हापूस आंबे खाणारे आता जमीन पिकाखाली आणण्यासाठी झाडे मोठ्या प्रमाणात तोडण्यासाठी पुढे येत आहेत.वरील जुन्या काळात गावठी आंब्याला राजमान्यता मिळाली होती, आता जुन्या आमराईची जागा संकरित बागांनी घेतली आहे. मात्र जुन्या काळातील केसर, खोपडी, नारळी ,गाडगे ,साखरी या जातीचे आंबे आता फारसे मिळतच नाहीत.नागरिक गांवरान आंब्याकडे तोंड फिरवू लागली आहेत.भविष्यात हे आंबे नष्ट होण्याचा धोका अधिक निर्माण झाला असून वृक्षप्रेमीनी गावठी आंबा वाचवन्यासाठी पुढे येण्याची गरज आहे...!!

गावठी आंबा पिकवण्याची पद्धतच निराळी...!!

  गावठी आंबे पिकवण्यासाठी पूर्वी गवत तसेच इतर नैसर्गिक साधनांचा उपयोग करून अनेक दिवस आंब्याची आळी घालून पिकवले जात असायचे.आता केमिकल्सचा वापर करून तात्काळ पिकलेल्या आंब्याची सर्रास बाजारात विक्री होताना दिसून येत आहे. कोकणातून विक्रीसाठी आलेला आंबा गरिबांना परवडत नाही. कारण गावरान आणि या आंब्याच्या किंमतीमध्ये  जवळजवळ डबलचा फरक असतो. मात्र चवीमुळे ग्राहक त्यांच्याकडेच जास्त ओढले जात आहेत.ग्रामीण परिसरात गांवराण आंब्याची लागवड करने सध्याच्या घडीला अतिमहत्वाचे आहेत.

कन्नड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी शेती कसन्यासाठी अडसर येणाऱ्या झाडांची कत्तल करण्यात येते. तेथील जागा शेती कसन्यासाठी उपयोगी करण्यात येते.  मात्र एक झाड तोडूंन त्याच परिसररात योग्य ठिकाणी 5 आंब्याची झाडांची  लागवड करावी, जेणे करून भविष्यवात पर्यावरणाचा धोका निर्माण होणार नाही व आंब्या सोबत अनेक झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर जाणार नाहीत. त्यांच बरोबर आमच्या नर्सरीमध्ये सर्व प्रकाचरी आंब्याची कलमे उपलब्ध आहेत.

 - काकासाहेब आडे, संचालक वैष्णवी नर्सरी, वाडीभारम्बा ता. कन्नड

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

पाणी जपून वापरा ! पुण्यातील 'या' भागात होणार पाणी कपात पाणी जपून वापरा ! पुण्यातील 'या' भागात होणार पाणी कपात
आधुनिक केसरी न्यूज पुणे : पुणेकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. पुणे शहराच्या उपनगरात पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने...
शेळगाव गौरी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटार व केबलची चोरी 
खुशखबर लाडक्या बहिणीचे 3000 रुपये 'या' महिन्यात खात्यात जमा होणार..!
अखेर झुंज थांबली,माजी आमदार अरुण (काका) जगताप यांचे निधन
माहुर : श्री दत्तशिखर संस्थानच्या मंदिरात त्रिमूर्ती दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा
दगडूशेठ गणपतीला  ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य 
सहायक अभियंत्याने स्वीकारली दोन हजाराची लाच ; एसिबीने ताब्यात घेतास कठोर कारवाई..!