शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून; कुर्‍हाडीच्या हल्ल्यात मोठ्या भावाचा मृत्यू

शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून; कुर्‍हाडीच्या हल्ल्यात मोठ्या भावाचा मृत्यू

आधुनिक केसरी न्यूज 

 गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसटोला येथे शेतीच्या वादातून सख्ख्या भावानेच मोठ्या भावाचा कुर्‍हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १७ जून) सकाळी घडली. या प्रकरणी केशोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृतक मोहन मंगरू कवडो (वय ४७) व आरोपी नारायण मंगरू कवडो (वय ४४) हे परसटोला (ता. अर्जुनी मोर, जि. गोंदिया) येथील सख्खे भाऊ आहेत. वडिलांनी दोन्ही भावांना शेतीची वाटणी करून दिली होती. मात्र वडिलांचा सांभाळ मृतक करत असल्याने त्यांच्या हिस्स्यातील चार बांद्या मृतक पेरत होता.

बुधवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास परसटोला शेतशिवारात दोघांमध्ये वडिलांच्या हिस्स्यातील शेतीवरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी नारायण कवडो याने कुर्‍हाडीने मोहन कवडो यांच्या दोन्ही पायांवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या मोहन कवडो यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या घटनेची फिर्याद मृतकाची पत्नी कविता मोहन कवडो (वय ४०) यांनी दिली. त्यांच्या तक्रारीवरून केशोरी पोलीस ठाण्यात अप.क्र. १०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परस्तोला परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून; कुर्‍हाडीच्या हल्ल्यात मोठ्या भावाचा मृत्यू शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून; कुर्‍हाडीच्या हल्ल्यात मोठ्या भावाचा मृत्यू
आधुनिक केसरी न्यूज   गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसटोला येथे शेतीच्या वादातून सख्ख्या भावानेच मोठ्या भावाचा कुर्‍हाडीने वार करून खून...
अखेर दोन वर्षांची मादी बिबट जेरबंद..!
दहा हजारांची लाच स्वीकारतांना महिला महसूल सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात..!
Breking news : कर्जमाफीसाठी तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन; पत्नी शर्वरी तुपकरांनी सरकारसाठी मागितली भीक
गुणात्मक,संख्यात्मक वाढीसाठी प्रयत्न करा; विभागप्रमुखांच्या बैठकीत मा.कुलगुरुंचे आवाहन
जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; एक गंभीर जखमी
खांडवी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार  पक्षाच्या वतीने रास्तारोको..!