विनानंबर रेती टिप्परची वृद्धाला जोरदार धडक; पांग्री उगले येथील ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

विनानंबर रेती टिप्परची वृद्धाला जोरदार धडक; पांग्री उगले येथील ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

आधुनिक केसरी न्यूज 

बाळासाहेब भोसले

सिदखेडराजा : रेतीची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ३ जून रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास शेलगाव राऊत फाट्याजवळ घडली. काशीराम राठोड (वय ८५, रा. पांग्री उगले) असे मृत वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काशीराम राठोड हे शेलगाव राऊत फाट्याजवळ महामार्ग ओलांडत असताना रेती घेऊन जाणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, ते हवेत उडून खाली कोसळले व गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत त्यांना उपचारासाठी जालना येथे हलविले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

विशेष म्हणजे, अपघातास कारणीभूत ठरलेले रेती वाहतूक करणारे टिप्पर विनानंबरचे असल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झालेली नव्हती.

दरम्यान, हिवरखेड पूर्णा, राहेरी दुसरबीड तसेच परिसरातील इतर भागांतून रेतीची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची चर्चा आहे. विना रॉयल्टी  वाहतूक करत असल्यामुळे हे टिप्पर वाले भरधाव वेगाने चालतात. महसूल प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. प्रशासनाचा वरदहस्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवैध्य रेती वाहतूक सुरू आहे. याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रेती तस्करीशी संबंधित वाहनांमुळे यापूर्वीही अनेक गंभीर अपघात घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याचे नागरिकांनी सांगितले.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अरुण लाखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड; आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून अभिनंदन अरुण लाखानी यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड; आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून अभिनंदन
आधुनिक केसरी न्यूज  चंद्रपूर : वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अरुण लाखानी यांची महाराष्ट्र विधान...
विनानंबर रेती टिप्परची वृद्धाला जोरदार धडक; पांग्री उगले येथील ८५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
शेखर गोरे नाराज; ९ जूनला कार्यकर्त्यांची बैठक, पुढील भूमिकेकडे लक्ष
गुगल सर्चचा कायापालट; शोधापासून संवादाकडे..!
परतूर शहरात व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून पैशाची बॅग पळवण्याचा प्रयत्न आरोपी इस्पितळात तर आरोपी फरार 
सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
माढा विधानसभा चे आमदार अभिजीत पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे कोळेगाव धरणातून सिना नदीला पाणी सोडण्याची केली मागणी