शेखर गोरे नाराज; ९ जूनला कार्यकर्त्यांची बैठक, पुढील भूमिकेकडे लक्ष

शेखर गोरे नाराज; ९ जूनला कार्यकर्त्यांची बैठक, पुढील भूमिकेकडे लक्ष

आधुनिक केसरी न्यूज 

सचिन सरतापे 

म्हसवड : सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून धैर्यशील कदम यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर शेखर गोरे यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री यांनी यापूर्वी विधानपरिषद आमदारकीबाबत दिलेला शब्द पाळला नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

शेखर गोरे हे सातारा-सांगली मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र अंतिम टप्प्यात धैर्यशील कदम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने गोरे समर्थकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत पुढील राजकीय भूमिका निश्चित करण्यासाठी शेखर गोरे यांनी ९ जून रोजी कुलकजाई फार्म हाऊस येथे कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या जाणार असून आगामी राजकीय वाटचाल, संघटनात्मक भूमिका आणि निवडणुकीसंदर्भातील निर्णय यावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सातारा आणि सांगली जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शेखर गोरे नेमकी कोणती भूमिका घेणार, महायुतीसोबत राहणार की स्वतंत्र भूमिका जाहीर करणार, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. ९ जून रोजी होणाऱ्या बैठकीनंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

शेखर गोरे नाराज; ९ जूनला कार्यकर्त्यांची बैठक, पुढील भूमिकेकडे लक्ष शेखर गोरे नाराज; ९ जूनला कार्यकर्त्यांची बैठक, पुढील भूमिकेकडे लक्ष
आधुनिक केसरी न्यूज  सचिन सरतापे  म्हसवड : सातारा-सांगली स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून धैर्यशील कदम यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर...
गुगल सर्चचा कायापालट; शोधापासून संवादाकडे..!
परतूर शहरात व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करून पैशाची बॅग पळवण्याचा प्रयत्न आरोपी इस्पितळात तर आरोपी फरार 
सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त
माढा विधानसभा चे आमदार अभिजीत पाटील यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे कोळेगाव धरणातून सिना नदीला पाणी सोडण्याची केली मागणी
राजुरा हत्याकांड : हर्षवर्धन सपकाळ रोहित पवार यांचा जळगाव पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या..!
कांदा उत्पादक शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहणार : हर्षवर्धन सपकाळ