नूतन विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी कार्यभार स्वीकारला
आधुनिक केसरी न्यूज
छत्रपती संभाजीनगर, दि. 17(विमाका) : छत्रपती संभाजीनगर विभागाचे नूतन विभागीय आयुक्त म्हणून जी. श्रीकांत यांनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. श्री. पापळकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, अपर आयुक्त प्रताप काळे, अपर आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, अपर आयुक्त दादासाहेब वानखेडे, अपर आयुक्त सुषमा देसाई, अपर आयुक्त मंजुषा मिसकर, सहआयुक्त राजेश काटकर, सहायक आयुक्त मंजुषा कापसे, सहआयुक्त देविदास टेकाळे, उपायुक्त सविता हरकर, महानगर नियोजनकार हर्षल बाविसकर, उपमहानगर नियोजनकार रवींद्र जायभाये, सहायक आयुक्त शुभांगी आंधळे, उप मुख्य लेखाधिकारी साधना बांगर यांच्यासह प्रादेशिक विभागप्रमुख उपस्थित होते.विभागीय आयुक्त श्री. श्रीकांत यांनी विभाग प्रमुखांशी संवाद साधत मराठवाड्यातील शेती, टंचाईस्थिती तसेच सामाजिक विषय व प्रशासकीय विषयाबाबत माहिती जाणून घेतली. सर्वांनी समन्वयाने काम करून विकास साधूया, असे आवाहन त्यांनी केले.
छत्रपती संभाजीनगर विभाग हा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा विभाग असून, पर्यटन विकासाला चालना देतानाच शिक्षण, आरोग्य, महत्वपूर्ण उपक्रम व रोजगाराभिमुखतेवर भर देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच विभागाला सर्वांगिण विकासाच्या दिशेने नेऊन राज्यात अग्रस्थानी आणण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासोबतच कामकाजात तंत्रज्ञानाचा अधिक वापर करून ई-ऑफिस प्रणालीचा 100 टक्के अवलंब करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासकीय कामकाजात अंतर्गत समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
श्री. श्रीकांत हे 2009 च्या यूपीएससी बॅचचे अधिकारी असून त्यांनी परभणी येथे परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केला. त्यानंतर किनवट येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून प्रथम नियुक्ती झाली. नांदेड-वाघाळा महानगरपालिका आयुक्त, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोला व लातूर जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी सहआयुक्त तसेच महानगरपालिका आयुक्त या पदांवर त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List