पोटच्या मुलानेच केला वडिलाचा खून ; रुई येथील हत्याकांडाचा २ तासांत छडा
आधुनिक केसरी न्यूज
सुखापूरी : अंबड तालुक्यातील मौजे रुई येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.तीर्थपुरी पोलिसांनी या गुन्ह्याचा अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या दोन तासांत मृताच्या मुलासह एका अल्पवयीन साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप धुराजी राजगुरु (वय ४५,रा.रुई,ता.अंबड) हे आपल्या घराच्या गच्चीवर झोपलेले असताना,८ एप्रिलच्या रात्री ते ९ एप्रिल २०२६ च्या पहाटे ६:३० वाजेच्या दरम्यान अज्ञात आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला.धारदार शस्त्राने तोंडावर आणि छातीवर वर्मी घाव घालून त्यांची हत्या करण्यात आली.या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.मृताचे भाऊ प्रल्हाद धुराजी राजगुरु यांनी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली,ज्यावरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.संशयाची सुई मृताच्या मुलाकडे वळताच पोलिसांनी विशाल दिलीप राजगुरु आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनीही खुनाची कबुली दिली. ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक जानवी बी.शेखर, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ,स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या सपोनि वैशाली पवार,भगवान शिंदे, नारायण माळी,अमर पोहार, अनिल मुसळे,विजय पवार, महेश तोटे,बाळासाहेब मंडलीक,विलास गाडेकर, गणेश मोरे,विठ्ठल वैराळ तसेच एलसीबीचे देविदास भोजने, लक्ष्मण आडेप आणि सतिष श्रीवास यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास जानवी बी.शेखर या करत आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List