पाचोर्यात दर्जेदार रस्त्यांची सुरुवात; प्रभाग ९ मध्ये भव्य भूमिपूजन
आधुनिक केसरी न्यूज
फकिरचंद पाटील
पाचोरा : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत पाचोरा शहरातील रस्ते विकासाला नवे बळ मिळणार असून, प्रभाग क्र. ९ मधील आदर्श नगर व खंडेराव नगर परिसरात रस्ते काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा उद्या दि. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यात नगराध्यक्षा सौ. सुनिता किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन होणार असून, उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, गटनेते सुमित किशोरआप्पा पाटील, मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे, नगरसेविका सौ. दिपाली किशोर पाटील, किशोर भास्कर पाटील तसेच नगरपरिषद अभियंता श्री. भैय्यासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रस्तावित रस्ते काँक्रिटीकरण कामामुळे आदर्श नगर व खंडेराव नगर परिसरातील नागरिकांना टिकाऊ व दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः पावसाळ्यातील चिखल व खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अडचणींवर मोठ्या प्रमाणात उपाय होणार असल्याचे सांगितले जात आहे.पाचोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषदेचे प्रयत्न सुरू असून, या प्रकल्पामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विकासकामाचा साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List