नांदेड येथे टोळी युद्धाचा भडका: तीन गुन्हेगारांचा खुन
एका गुन्हेगारांचा मयताच्या नातेवाईकांकडून शासकीय रुग्णालयातच खुन
आधुनिक केसरी न्यूज
नांदेड : शहरातील भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डिमार्ट परिसरात रात्री दिड वाजण्याच्या सुमारास दोन गुन्हेगारांच्या टोळीत जून्या वादातून टोळी युद्ध भडकले असून तलवारीने व खंजीराने एकमेकांवर वार करुन तीन जण ठार झाले आहेत. दरम्यान एका गुन्हेगारांचा शासकीय रुग्णालयात खुन करण्यात आला आहे. भाग्यनगर पोलिस ठाण्यात एकमेकांच्या विरोधात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळाला विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप व पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
नांदेड शहरातील गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नांदेड शहरातील डि मार्ट परिसरात असलेल्या एका एका सिनेमागृहात अर्जितसिंग व त्यांचे काही मित्र सिनेमा पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी महमंद आरबाज, सय्यद अवेज यांनी पाळत ठेऊन रात्री दिड वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर तलवार व खंजीराने सपासप वार करुन अर्जितसिंग यांचा खुन केला तर या वादात अर्जितसिंग सोबत असलेल्या मित्रांनी केलेल्या हल्ल्यात सय्यद अवेज यांचा खुन झाला तर महमंद आरबाज हा गंभीर जखमी झाला. सदरील घटना ही भाग्यनगर पोलिसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. जखमी मोहम्मद अरबाज यास वैद्यकीय उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदरील मारामारीची घटना अर्जितसिंग यांच्या भावाला समजताच त्यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेऊन जखमी महंमद अरबाज यांच्यावर शासकीय रुग्णालयात हल्ला केला या हल्ल्यात जखमी महंमद अरबाज यांचा खुन करण्यात आला आहे.
सदरील प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी दोन्ही टोळीतील अनेकांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळाला विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने, पोलिस निरीक्षक तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली आहे. भाग्यनगर पोलिसांनी सदर प्रकरणांचा शोध घेण्यासाठी विशेष पोलिस पथके तयार केली असून अनेकांना अटक केली आहे. भाग्यनगर पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या आरोपी विरोधात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नांदेड शहरातील डि मार्ट परिसरात घडलेल्या घटनेत साईलाला टोळी व सय्यद अवेज व अरबाज टोळीतील गुन्हेगारांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी मयत अर्जितसिंग व महंमद अरबाज यांच्यात वाद झाला होता. त्या वादातून ही रक्तरंजित लढाई झाली आहे. सदरील घटनेमुळे नांदेड हदरले आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List