मातागुजरीजी विसावा गार्डन येथे उपमहापौरांचे स्टिंग ऑपरेशन गार्डन रक्षक वैयक्तिक स्कॅन कोडवर घेत होता गार्डन प्रवेश शुल्कगार्डन रक्षक गणेश हनमंते यास केले सस्पेंड 

मातागुजरीजी विसावा गार्डन येथे उपमहापौरांचे स्टिंग ऑपरेशन गार्डन रक्षक वैयक्तिक स्कॅन कोडवर घेत होता गार्डन प्रवेश शुल्कगार्डन रक्षक गणेश हनमंते यास केले सस्पेंड 

आधुनिक केसरी न्यूज 

नांदेड :  शहरातील प्रसिद्ध व मध्यभागी असलेले माता गुजरीजी विसावा उद्यानात उद्यान रक्षक हनुमंते स्वतः वैयक्तिक यूपीआय स्कॅन कोडवर उद्यानात जाणाऱ्या साठीचे शुल्क घेत असताना नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेचे उपमहापौर दीपकजी रावत यांनी स्टिंग ऑपरेशन करून रंगेहात पकडले आणि हनमंते यांना नोकरीतून तात्पुरते सस्पेंड केले असल्याचे मनपा उद्यान प्रशासनाकडून कळाले आहे. दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ती खात्री करून घेण्यासाठी उपमहापौर श्री दीपकजी रावत स्वतः माता गुजरीजी विसावा उद्यानात मनपाचे उद्यान अधीक्षक फराहत बेग यांच्या सोबत पोहोचले. आणि त्यांना उद्यानात प्रवेश करताना गणेश हनमंते हे स्वतः च्या स्कॅन कोडवर लोकांकडून प्रवेश शुल्क घेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गणेश हनुमंत हे उद्यानात माळी या पदावर कार्यरत होते .त्यांच्याकडे मनपाने उद्यानात प्रवेश करणाऱ्यांसाठी बुकिंगची सुद्धा जबाबदारी सोपवली होती. माध्यम प्रतिनिधींनी संबंधिताची प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर पुढील बाबी स्पष्ट झाल्या.

*मनपाचे उद्यान अधीक्षक फराहत बेग:

" महापौरांनी जेव्हा स्टिंग ऑपरेशन केले त्यावेळेस मी त्यांच्यासोबत होतो. आणि गणेश हनमंते यांना पुराव्यासह वैयक्तिक यूपीआय स्कॅन कोडवर लोकांकडून उद्यानात जाण्यासाठीचे प्रवेश शुल्क घेताना पकडले असून त्यांना तात्पुरते सस्पेंड केलेले आहे. किती दिवसापासून हा प्रकार सुरू होता ?  किती पैसे त्यांच्या यूपीआय आयडीवरती गेले  ?याची चौकशी सुरू आहे. "उपमहापौर दीपकजी रावत : " गणेश हनुमंते या सस्पेंड केले असून वैयक्तिक यूपीआय बँक अकाउंट ची चौकशी सुरू आहे त्यानंतरच कळेल की किती रुपयाचा अपहार झाला आहे. "

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

सातारा येथे नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; निष्पक्ष चौकशीची मागणी सातारा येथे नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू; निष्पक्ष चौकशीची मागणी
आधुनिक केसरी न्यूज  म्हसवड : सातारा जिल्ह्यातील विकासनगर परिसरात प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेचा अवघ्या १२ दिवसांत झालेला संशयास्पद मृत्यू हा अत्यंत...
वरोड्यात रवी कमल जिनिंगला भीषण आग; अंदाजे दहा करोड रुपये नुकसानीचा अंदाज
शिकारच्या शोधात वाघाचा विहीरीत पडून मृत्यू
गुरुनिष्ठेचं सर्जनशील दर्शन घडवणारा ग्रंथ : प्रा. डॉ. कैलास अंभुरे
आशाताईंच्या सुरांमध्ये निसर्गाची कोमलता
मंठा पोलिसांची गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई : ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट
सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद : विजय वडेट्टीवार