स्वप्न होतं माझं, पण हसू झालं...'; सोलापुराच्या लेकीने हातावर वेदना कोरून संपविली आपली जीवनयात्रा
आधुनिक केसरी न्यूज
महेश गायकवाड
सोलापूर : माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे एका २२ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे.'स्वप्न होतं माझं, पण हसू झालं...'; असे तळ हातावर आपल्या वेदना लिहून सोलापुराच्या लेकीने आयुष्य संपवले आहे
"हसू झालंय माझं.., माझं पार्लर बंद केलं.., जीव होता तो माझा.. स्वप्न होतं गं..!" आत्महत्येपूर्वी एखाद्या मुलीने आपल्या हातावर असे शब्द कोरावेत, यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय? सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील खुळेवाडी येथे एका २२ वर्षीय विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. पायल रणदिवे असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे तिचे स्वप्न सासरच्यांनी पायदळी तुडवल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासू-साऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.
हातावर लिहिलेली 'सुसाईड नोट' पाहून काळजाचे पाणी होते.
पायलला ब्युटी पार्लर सुरू करून स्वतःची ओळख निर्माण करायची होती. तिने त्यासाठी क्लासही लावला होता. मात्र, सासरच्या मंडळींनी तिचे हे पार्लर बंद पाडले. शनिवारी सायंकाळी पायलने राहत्या घरी गळफास घेतला. धक्कादायक म्हणजे, तिने कागदावर चिठ्ठी न लिहिता आपल्या हातावरच मृत्यूच्या वेदना लिहिल्या होत्या. "आजवर शांत बसले पण आता नाही... चांगल्या आई-बापाची लेक आहे म्हणून निघून गेले नाही.. माझ्यामुळे त्रास झाला असेल तर सॉरी," असे शब्द वाचताना उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले.
लेकीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा दिसल्या नंतर माहेरच्या लोकांचा मोठा संताप झाला.
पायलचा हा मृत्यू केवळ आत्महत्या नसून सासरच्यांनी केलेला छळ असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. पायलच्या मृतदेहावर मारहाणीचे व्रण आणि जखमा आढळून आल्या आहेत. तिचे स्वप्न हिरावून घेत तिला शारीरिक आणि मानसिकरीत्या प्रचंड त्रास दिला जात होता, असे तक्रारीत म्हटले आहे. "एका जिद्दी मुलीचा सासरच्यांनी गळा घोटला," अशा भावना तिचे मामा गणेश कदम यांनी व्यक्त केल्या.
पायलच्या मृत्यू नंतर
तिघे गजाआड, झाले असून एक जण झाला आहे.
या घटनेनंतर नातेपुते पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी पायलचा पती, सासू आणि सासरा अशा तिघांना तातडीने अटक केली आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी (दीर) अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एका शिकलेल्या आणि स्वप्न पाहणाऱ्या लेकीचा असा करुण अंत झाल्याने संपूर्ण माळशिरस तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List