शेगाव दर्शन बंद ही अफवाच! समाज माध्यमावरील मजकूर चुकीचा
आधुनिक केसरी न्यूज
शेगांव : दि.१७ भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या शेगाव दौऱ्यानिमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थान मधील दर्शन बंद राहणार असा मजकूर समाज माध्यमावर वेगाने प्रसारित होत आहे. यामुळे गजानन महाराजांच्या हजारो भक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नियोजित दौऱ्यानुसार राष्ट्रपती श्रीमती मुर्मु या दि.२५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे येणार आहे. त्यामुळे दि. २५ च्या आसपास दर्शन बंद राहणार अश्या समाज माध्यमावरील मजकूराने हजारो भाविक संभ्रमित झाले आहे. मात्र ही चर्चा, मजकूर केवळ अफ़वाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज दिवसभर यासंदर्भात संस्थान आणि प्रसिद्धी माध्यमाकडे राज्यातून विचारणा होत असल्याचे चित्र आहे. विविध समाज माध्यमावर हा मजकूर वेगाने प्रसारित झाला.’ त्यावर ‘ज्यांना शेगांव दर्शनाचा मानस आहे त्यांनी,दि. २३ ते दि. २६ फेब्रुवारी दरम्यान शक्यतो टाळावे, कारण महामहीम राष्ट्रपतींचा शेगांव भेटीचा दौरा निश्चित झाला आहे. सर्व यात्री निवासमधे कमांडो निवास व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक दर्शन ही २५ तारखेला राष्ट्रपती महोदया आवारात असे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. कृपया नोंद घ्यावी’ असा हा मजकूर होता. या पार्श्वभूमीवर पडताळणी केली असता समाज माध्यमावरील हा मजकूर चुकीचा व अफवाच असल्याचे स्पष्ट झाले.
श्री गजानन महाराज मंदिर येथे २३ ते २६ मार्चदरम्यान महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या प्रस्तावित भेटीच्या पार्श्वभूमीवर दर्शन बंद ठेवले जाणार असल्याच्या चर्चानी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मात्र या सर्व चर्चा निराधार असून कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य भक्तांना दर्शनापासून वंचित ठेवण्याचा निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट झाले. सुरक्षा यंत्रणांच्या प्रोटोकॉलनुसार काही वेळा अल्पकालीन हालचाली किंवा व्यवस्थात्मक बदल आवश्यक ठरू शकतात. मात्र याचा अर्थ दर्शन पूर्णतः बंद होणार नाही असे स्पष्ट झाले आहे. महामहिम राष्ट्रपती महोदया दि. २५ फेब्रुवारीला मंदिर परिसरात असेपर्यंत सार्वजनिक दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. याची भक्तांनी आवश्यक नोंद घ्यावी
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List