अर्जित रजा मंजूर करण्यासाठी तीन हजाराची लाच स्वीकारताना केंद्र प्रमुखास रंगेहाथ अटक

लोह्यातील शिक्षण विभागातील प्रकार

अर्जित रजा मंजूर करण्यासाठी तीन हजाराची लाच स्वीकारताना केंद्र प्रमुखास रंगेहाथ अटक

आधुनिक केसरी न्यूज

लोहा : दैनंदिन लाचखोरीच्या घटना घडताना आणि लाचेची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आल्याच्या असंख्य घटना घडत असताना लाचखोरीचे प्रकार कांहीं संपत नसल्याचे पुन्हा एकदा लोह्यातील शिक्षण विभागातील घटनेवरून समोर आले आहे. दि. १६ रोजी सकाळी अर्जित रजा मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली. सदरील घटनेप्रकरणी लोहा पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

 शिस्त, प्रामाणिकपणाचे धडे शिकविणाऱ्या गुरुजींच्या कार्यालयात जर लाचखोरीच्या घटना घडत असतील तर नव्या पिढीने शिक्षण ते काय घ्यायचे असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे. तालुक्यातील एका प्राथमिक शाळेतील शिक्षकाने खाजगी कामानिमित ४६ दिवसांच्या अर्जित रजेसाठी दि. ९ रोजी लोहा पंचायत समिती अंतर्गत गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला होता. शिक्षण विभागातील आस्थापना विभागात लिपिकाचे काम तसेच गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांचे कार्यालयीन काम पाहणारे केंद्रप्रमुख दिगांबर रामचंद्र शिंदे यांनी तक्रारदारास अर्जित रजा मंजूर करण्यासाठी ४ हजार रुपयांची मागणी केली होती. दि. १३ रोजी तक्रारदार यांना आरोपी शिंदे यांनी भेटून तुमची अर्जित रजा मंजूर करायची असेल तर मला दोन-तीन हजार रुपये देऊन टाका असे म्हणून लाचेची मागणी केली. तक्रादारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत विभागाशी संपर्क साधला असता सदर विभागाने दि. १६ रोजी रचून सापळा लावला. केंद्रप्रमुख दिगंबर शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडून अर्जित रजा मंजूर करून देण्यासाठी स्वतःसाठी ३ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ मिळून आले. आरोपीची अंगझडती घेतली असता झडतीत एक मोबाईल व नगदी २ हजार ७०० रुपये मिळून आले. याप्रकरणी ला. प्र. वि. चे पोलिस निरीक्षक श्रीमती अनिता चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिगंबर शिंदे यांच्याविरुद्ध लोहा पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्रीमती अर्चना करपुडे करत आहेत.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

अर्जित रजा मंजूर करण्यासाठी तीन हजाराची लाच स्वीकारताना केंद्र प्रमुखास रंगेहाथ अटक अर्जित रजा मंजूर करण्यासाठी तीन हजाराची लाच स्वीकारताना केंद्र प्रमुखास रंगेहाथ अटक
आधुनिक केसरी न्यूज लोहा : दैनंदिन लाचखोरीच्या घटना घडताना आणि लाचेची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आल्याच्या असंख्य घटना घडत असताना...
महापुरुषाची विटंबना ; पोलिसांची तत्परता अवघ्या काही तासात जळगाव पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या
भटाळा दर्शनावरून परत येताना मालवाहक वाहन पलटी १ ठार, १७ प्रवासी जखमी
दुचाकी वाहन जळून खाक; मार्डा रोडवर कुणबी भवनजवळील घटना
एसीबीच्या जाळ्यात फसला सहायक महसूल अधिकारी 
भाजप श्रेष्ठींची यशस्वी व्युहरचना व सामुहीक प्रयत्नामुळेच चंद्रपूर महानगरपालिकेत ; भाजपाची सत्ता : हंसराज अही
वंचित बहुजन आघाडीची चंद्रपुरातील शहर कार्यकारणी बरखास्त  चंद्रपूर मनपा महापौर निवडणुकीतील भूमिका भोवली