वंचित बहुजन आघाडीची चंद्रपुरातील शहर कार्यकारणी बरखास्त  चंद्रपूर मनपा महापौर निवडणुकीतील भूमिका भोवली 

वंचित बहुजन आघाडीची चंद्रपुरातील शहर कार्यकारणी बरखास्त  चंद्रपूर मनपा महापौर निवडणुकीतील भूमिका भोवली 

आधुनिक केसरी न्यूज

चंद्रपूर :  दि. १०/२०२६ चंद्रपूर मनपा महापौर निवडणुकीमध्ये अनुपस्थित राहत आपलं इप्सित साध्य करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष स्नेहल रामटेके आणि त्यांची संपूर्ण शहर कार्यकारणी किसन चव्हाण महासचिव, वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांनी बरखास्त केली आहे.वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर शहराध्यक्ष स्नेहल रामटेके यांच्या अध्यक्षतेखालील चंद्रपूर शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. याची चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी नोंद घ्यावी असे महासचिव, किसन चव्हाण यांचे पत्र आज चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या नंतर अवघ्या काही तासातच धडकले. 

चंद्रपूर मनपा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे दोन उमेदवार निवडून आले होते. प्रभाग क्रमांक 13 मध्ये लता साव तर प्रभाग क्रमांक 17 मध्ये लहू मरसकोल्हे हे दोन्ही उमेदवार वंचित बहुजन आघाडी कडून निवडून आलेले होते. चंद्रपूर महापौर निवडणूकीमध्ये मात्र हे दोन्ही उमेदवार अनुपस्थित राहिले. हे दोन उमेदवार सभागृहात उपस्थित असते तर निकाल काहीतरी वेगळा लागला असता यात शंकाच नाही. कारण, भाजपाच्या संगीता खांडेकर या अवघ्या एका मताने निवडून आल्या तर उपमहापौरांना समसमान मत मिळाल्यामुळे ईश्वरचिठ्ठीने विजय घोषित करण्यात आले.  त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे दोन मत नेमके कुणाला मिळाले असते आणि याचा फायदा कोणाला झाला असता याची चर्चा आता चंद्रपुरात चांगलीच रंगली आहे. 

 एकीकडे ही चर्चा चांगली असतानाच वंचित बहुजन आघाडीची स्नेहल रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली असलेली संपूर्ण शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

mahaveer ghar sansar

Adhunik Kesari Subscribe

Latest News

भाजप श्रेष्ठींची यशस्वी व्युहरचना व सामुहीक प्रयत्नामुळेच चंद्रपूर महानगरपालिकेत ; भाजपाची सत्ता : हंसराज अही भाजप श्रेष्ठींची यशस्वी व्युहरचना व सामुहीक प्रयत्नामुळेच चंद्रपूर महानगरपालिकेत ; भाजपाची सत्ता : हंसराज अही
आधुनिक केसरी न्यूज   चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीत भाजपाला अपयश आले होते मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व  पक्षश्रेष्ठींनी लक्ष...
वंचित बहुजन आघाडीची चंद्रपुरातील शहर कार्यकारणी बरखास्त  चंद्रपूर मनपा महापौर निवडणुकीतील भूमिका भोवली 
चंद्रपूर मनपाच्या उपमहापौर पदावर ईश्वर चिट्ठीने प्रशांत दानव विजयी 
चंद्रपूरच्या महापौर पदावर भारतीय जनता पार्टीच्या संगीता खांडेकर विजयी
अखेर  चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी झाली रे बाप्पा..!
येत्या 5 वर्षात विदर्भाचा सर्वांगीण विकास करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अबुजमाड कारवाईत शहीद पोलीस कमांडो दीपक चिन्ना मडावी यांना पोलीस मुख्यालयात शासकीय मानवंदना