चंद्रपूरच्या महापौर पदावर भारतीय जनता पार्टीच्या संगीता खांडेकर विजयी
आधुनिक केसरी न्यूज
चंद्रपूर : शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून ठेवलेल्या चंद्रपूर महानगरपालिका महापौर पदाची निवडणूक आज संपन्न झाली. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या संगीता महापौर या विजयी झाल्या असून त्यांनी काँग्रेसच्या संगीता महाडोळे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असूनही अंतर्गत गटबाजीमुळे सत्ता स्थापनेपासून दूर राहिला. तर एआयएम सभागृहात उपस्थित राहूनही मतदानापासून तटस्थ राहिले.वंचित बहुजन आघाडीचे दोन उमेदवार या निवडणुकीपासून दूर राहिले. तर, उबाठा गटाने भारतीय जनता पार्टीला साथ देत अखेर महापौर पदावर संगीता खांडेकर यांचा विजय झालेला आहे. निवडणूक झाल्यानंतर तब्बल 26 दिवसानंतर महापौर पदाची निवडणूक पार पाडली. प्रचंड उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यंत ताणून ठेवलेल्या या महापौर पदाच्या निवडणुकीचा निकाल नुकताच हाती आला असून भारतीय जनता पार्टीला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने साथ दिली आणि अखेर चंद्रपूर महानगरपालिकेत दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या संगीता खांडेकर या महापौर पदावर विराजमान झाल्या आहेत.
About The Author
Related Posts
Post Comment
mahaveer ghar sansar



Comment List